जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड. दिलीप बोरसे 

dbr
dbr

जळगाव : येथील जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष पदांसाठी सोमवारी मतदान झाले. मतमोजणी नंतर अध्यक्षपदी ऍड. दिलीप बोरसे, सचिवपदी ऍड. दर्शन देशमुख निवडून आले. तर यापूर्वी कार्यकारिणी सदस्य म्हणून 10 सदस्य बिनविरोध निवडून आले. 

जिल्हा वकील संघाच्या निवडणकीसाठी सोमवारी सकाळी 8 वाजेपासून मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह दिसून आला. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जिल्हा वकील संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी मतदान झाले. एकूण 742 पैकी 652 मतदारांनी मतदान केले. एकूण 87.87 टक्के मतदान झाले. संध्याकाळी साडेचार वाजता मतमोजणी सुरू झाली. प्रथम सहसचिव पदासाठी मतमोजणी झाली. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ऍड.आर. एन. पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी ऍड.ए.आर.सरोदे, ऍड.शिरीन अमरेलीवाला यांनी काम पाहिले. निवडणूकीसाठी सहाय्यक म्हणून ऍड.जयंत कुरकुरे, ऍड.श्रीकृष्ण निकम,ऍड.विरेन्द्र पाटील, ऍड.अरविन्द शुक्‍ला,ऍड.अमोल बारी,ऍड.संदीप पाटील, ऍड.चंद्रशेखर निकुंभ यांनी काम पाहिले. 

हे झाले विजयी 
अध्यक्षपदी ऍड. दिलीप बोरसे, उपाध्यक्षपदी ऍड.प्रभाकर पाटील, सचिव पदासाठी ऍड.दर्शन देशमुख, कोषाध्यक्षपदी ऍड.शरद न्हायदे, सहसचिव पदासाठी ऍड.स्मिता झाल्टे हे विजयी झाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com