आठशे एकरावरील केळी बागांचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

आठशे एकरावरील केळी बागांचे नुकसान 

रावेर : तापी व पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे हतनुर धरणाचे बॅक वॉटर शेती शिवारातील केळी बागेत घुसल्यामुळे तालुक्यातील सुमारे सातशे ते आठशे एकर केळी पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र अद्याप नुकसानीचे पंचनाम्यास सुरुवात न झाल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. 

आठशे एकरावरील केळी बागांचे नुकसान 

रावेर : तापी व पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे हतनुर धरणाचे बॅक वॉटर शेती शिवारातील केळी बागेत घुसल्यामुळे तालुक्यातील सुमारे सातशे ते आठशे एकर केळी पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र अद्याप नुकसानीचे पंचनाम्यास सुरुवात न झाल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. 

काल (ता. २९) तापी नदीला पूर आल्यामुळे हतनूर धरणाचे बॅक वॉटर शेती शिवारात शिरल्यामुळे तालुक्यातील विटवा, निंबोल, ऐनपूर, अजनाड, नेहेते, खिरवड, निंभोरा सिम आदी गावातील शेती शिवारातील केळी पीक पाण्याखाली आले हाते. यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काल रात्रीपासून सुरू पुराचे पाणी पहाटे ओसरले. या पुराच्या पाण्यामुळे नदी काठावरील सुमारे आठशे एकर शेतातील केळीचे नुकसान झाले आहे. 

पंचनाम्‍यांची मागणी 
दरम्यान, या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी महसूल किंवा कृषी विभागाकडून आज कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत तहसीलदार उषाराणी देवगुणे यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ज्या शेत जमिनी अद्याप संपादित केलेल्या नसतील त्या जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असेल तर पंचनामे करण्यात येतील, त्याबाबत तलाठ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, शासनाने सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी केळी उत्पादकांनी केली आहे. 

हतनूरचे १९ दरवाजे उघडे 
दरम्यान तापी आणि पूर्णा या नद्यांच्या प्रवाह क्षेत्रात आज दुपारपासून ११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाचे १९ दरवाजे पूर्ण उघडे ठेवण्यात आले आहेत. धरणातून १६०१ घनमीटर प्रति सेकंद या वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 

काल पुराच्या पाण्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात अनेक शेतकऱ्यांची जमीन अद्याप शासनाने संपादीत केली नाही. काही जमिनी न्याय प्रविष्ट आहेत. यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करावे व नुकसान भरपाई मिळावी 
 जितू पाटील, 
पंचायत समिती सदस्य, निंबोल, ता. रावेर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgon marathi news kelibag nuksan