राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव  महानगराध्यक्षपदी अभिषेक पाटील 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव 
महानगराध्यक्षपदी अभिषेक पाटील 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव 
महानगराध्यक्षपदी अभिषेक पाटील 

जळगाव: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव शहर महानगराध्यक्षपदी अभिषेक शांताराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत नियुक्तीचे पत्र त्यांना दिले आहे. 
अभिषेक पाटील हे पक्षाचे जळगाव महानगर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी नुकतीच जळगाव विधानसभा मतदार संघातून पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना तब्बल 48हजारा मतदान पडले होते.पक्षातर्फे आज त्यांची जळगाव शहर महानगराध्यक्षपदी नियक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना दिले आहे. 

पक्षाचे महानगर युवक अध्यक्षपदाचे आपण चांगले काम केले, तसेच जळगाव विधानसभा निवडणूकीतही आपल्याला चांगले मतदान पडले. त्याची दखल घेवून प्रक्षाने आपल्यावर महानगराध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे. आपण शहरात पक्ष बळकट करणारा आहोत. 
अभिषेक पाटील 
जिल्हा महानगराध्यक्ष 
जळगाव 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgon marathi news ncp Abhishek Patil as the General Secretary