जळगाव-एरंडोल तालुक्‍यात लुटारू टोळ्यांचे "जंगलराज' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

जळगाव-एरंडोल तालुक्‍यात लुटारू टोळ्यांचे "जंगलराज' 

जळगाव : जळगाव-पाचोरा रस्त्यावर शिरसोली-दापोरा दरम्यान गुरुवारी भरदिवसा दांपत्याला लुटल्याची घटना घडली. शिरसोली-म्हसावदच्या पाठीमागे श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थानापर्यंत जंगल आहे. तर पश्‍चिमेकडे कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मागील टाकरखेडा परिसरातही दाट झाडी असल्याने या परिसरातील रस्त्यांवर लुटारू टोळ्या सक्रिय आहेत. 

शिरसोली-रामदेववाडी रस्त्यावर नेवरे शिवारात 25 वर्षीय बळीराम आखाडू भिल या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृत्युपूर्वी बळीरामसह त्याच्या सहकाऱ्यांनी या मार्गावरून जाणाऱ्या दांपत्याला अडवून, मारहाण करत लूट केली होती. 

वीस वर्षांपासून हाच त्रास 
जळगाव-पाचोरा रस्त्यावरील म्हसावद येथून श्री क्षेत्र पद्मालयकडे जाणारा रस्ता वनजमिनीचा परिसर आहे. या परिसरात महाविद्यालयीन प्रेमीयुगलांचा या परिसरात बऱ्यापैकी वावर आहे, तसाच वावर कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या मागील बाजूस टाकरखेड्यातील जंगलातून थेट पद्मालय जंगलापर्यंतच्या परिसरात हिंडणाऱ्या जोडप्यांवर पाळत ठेवून त्यांची लूटमार करणे, अंगलट करताना जोडपे सापडल्यास त्यांना मारहाण करून कपडे पळवून नेणे, नंतर पैसे, मोबाईल दागिन्यांची मागणी करणे, मोबाईलमध्ये चित्रण करून ब्लॅकमेलिंगचे प्रकारही या परिसरात मोठ्या प्रमाणावर केले जातात. पोलिसांत मात्र या तक्रारी दाखल होत नाही. वर्ष दोन वर्षांत एकदोन तक्रारी आल्या की, पोलिसांचे लक्ष जाते.. तोपर्यंत "जंगलराज' सुरूच असतो, अशी स्थिती आहे. 

बळीरामला मारलं कोणी? 
रविवारच्या रस्तालुटीच्या घटनेनंतर घटनास्थळावर बळिराम आखाडू भिल याचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला होता. मृत्यूनंतर त्याच्या अंगावरचे कपडे काढून घेत ओळख पटू नये, यासाठी संशयितांनी प्रयत्न केल्याची शंका व्यक्त होत आहे. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला. तो शासकीय प्रयोगशाळेत तपासणीला पाठविला आहे. स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण राखून ठेवले आहे. परिणामी, मृत बळिराम आखडू भिल लुटीत सहभागी होता, घटनेनंतर पळून जाताना त्याला जमावाने मारले, लूटमार केली, त्यापैकी इतर तीन साथीदारांनी मारून पोत पळवली की, अन्य कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला आहे, हे अद्यापही समोर आलेले नाही. त्याच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgon marthi news lutarunchajagalraj