कॉटन फेडरेशन 20 पासून कापूस खरेदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

कॉटन फेडरेशन 20 पासून कापूस खरेदी 

जळगाव ः राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे येत्या 20 नोव्हेंबरपासून शासकीय कापूस खरेदी सूरू होईल. जळगाव विभागात पहिल्या टप्प्यात धरणगाव, भडगाव, अमळनेर, पारोळा, मालेगाव या ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात येतील. यंदा कपाशीच्या खरेदी दरात शंभर रूपयांची वाढ देण्यात येईल. गतवर्षी 5450 चा दर होता यंदा 5550 चा दर राहिल, अशी माहिती पणन महासंघाचे विभागीय संचालक संजय पवार यांनी "सकाळ' ला दिली. 

खानदेशात शेतकऱ्यांचा कापूस निघण्यास सूरवात झाली आहे. मुख्यतः शेतकऱ्यांना जे हमीचे उत्पन्न वाटत होते. त्या कपाशीचे अतोनात नूकसान झाले आहे. अतीपावसामुळे कपाशीच्या सरकीलाच कोंब फुटू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस वेचून घरात ठेवणेही जिकरीचे झाले आहे. शासनाने त्वरीत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी श्री.पवार यांनी फेडरेशनकडे केली आहे. फेडरेशनचे चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन ऍड.विष्णू साळुंखे, व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना यांना देखील केंद्र सूरू होण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. येत्या वीस नोव्हेंबर पर्यंत 
ही केंद्रे सुरू होतील अशी अपेक्षा आहे. 

धरणगावसह भडगाव, अमळनेर, पारोळ्याला केंद्रे 
जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्रे धरणगाव, भडगाव, अमळनेर, पारोळा व मालेगाव या ठिकाणी केंद्रे सुरू होण्यास मंजूरी मिळाली आहे.जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक या जिल्ह्यात एकंदरीत 8 लाख 97 हजार 922 हेक्‍टवर जमिनीच्या क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgon news- cottan fedresheni-cottan-purchses