दिवसा ट्रकचालक अन रात्री घरफोड्या 

दिवसा ट्रकचालक अन रात्री घरफोड्या 

दिवसा ट्रकचालक अन रात्री घरफोड्या 

जळगाव : मूळ राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील रहिवासी अट्टल गुन्हेगाराने ट्रकचालकाचा व्यवसायाला घरफोडीचे साधन बनवले होते. आंध्र प्रदेश ते गुजरात महामार्गालगतच्या नागरी वस्त्यांना लक्ष करीत घरफोड्या करून पसार होणारा ट्रकचालक संजय भवरलाल देवडा (वय 45) याला गुन्हेशाखेने बेड्या ठोकल्या. गुजरात, आंध्रप्रदेशसह महाराष्ट्रात महामार्गालगत घरफोड्यांची शंभरी गाठलेल्या या भामट्याकडून गुन्हेशाखेने अडीच लाखांचे सोने जप्त केले आहे. 
जळगाव शहरात महामार्गालगतच्या नागरी वस्त्यांना लक्ष करून घरफोड्यांचे सत्र सुरू होते. गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी नुकतेच गुन्हेशाखेला पंधरा दिवसांचा "अल्टिमेटम' देत गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनात घरफोड्यांचा तपास गुन्हेशाखा निरीक्षक बापू रोहम यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक स्वप्नील नाईक, राजेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, किशोर राठोड, विनोद पाटील, अरुण राजपूत, रणजित जाधव नरेंद्र वारुळे, विजय पाटील यांच्या पथकाने प्रयत्नाची शिकस्त करीत राजस्थानमधून संजय भवरलाल देवडा (वय 45) याला ताब्यात घेतले. संशयिताला पोलिसी "खाक्‍या' दाखवताच त्याने निमखेडी शिवारातील रमेश जगदेव सरदार (रा. गिरणाई कॉलनी) यांच्या घरची घरफोडी कबूल केली असून, घरफोडीतील 6 तोळे सुमारे अडीच लाखांचे सोने काढून दिले आहे. 

देशभर घरफोड्या 
अटकेतील संजय देवडा हा ट्रकचालक असून आंध्र ते गुजरात या मार्गावर तो आधी ट्रकमध्ये माल भरून नेत असे. नियोजित जिल्ह्यात माल खाली केल्यावर महामार्गालगत ट्रक खराब झाल्याचा बहाणा करून ट्रक उभा करून ठेवत असे. त्या ठिकाणी दिवसा रेकी करून रात्री बंद घर फोडून माल लंपास करत होता. त्याने निमखेडी शिवारातील रेश्‍मी समीर ठाकूर (बिबा पार्क, 22 ऑक्‍टोबर), अरुण मनोहर बडगुजर (द्वारकानगर,14 ऑक्‍टोबर), चंद्रशेखर भालचंद्र ठाकूर (द्वारकानगर,21 ऑक्‍टोबर) या तीन घरफोड्यांबाबत संशयिताकडे तपास सुरू असून, संजय देवडा याने सोलापूर जिल्ह्यात 11 घरफोड्या केल्याचे तसेच महामार्गालगत विविध राज्यात घरफोड्या केल्याचे कबूल केले आहे. 

असे मोडले सोने 
ज्या ठिकाणी ट्रकची ट्रीप घेऊन गेला, त्या गावात आणि जिल्ह्यात महामार्गालगतच संजय देवडा घरफोड्या करीत होता. गस्तीवरील पोलिसांनी चौकशी केल्यावर ट्रक खराब झाल्याचा बहाणा करून तो घरफोडीसाठी थांबून राहत होता. घरफोडीत मिळालेला माल घेऊन तो राजस्थानी सराफाकडे मुलगी आजारी असल्याचे सांगत सोने मोडत असल्याचेही त्याने सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com