पुढील काळात देशांतर्गत विमानसेवा कमी दरात: दानवे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

जालना: केंद्र सरकारने राज्यातील बंद असलेली विमानतळे नव्याने सुरू केल्याने देशातील उद्योजकांनी यावर्षी 900  नवीन विमाने खरेदी करण्याचा विदेशी कंपनीशी करार आहे. त्यामुळे  पुढील काळात सामान्य नागरिकांसाठी देशांतर्गत विमानसेवा कमी दरामध्ये उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

जालना येथे डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचे आज (सोमवार) भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, औरंगाबादचे डाकघर अधिकारी प्रणव कुमार, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, माजी आमदार विलास खरात, जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे आदींची प्रमुख उपस्थिती होते.

यावेळी बोलताना श्री. दानवे म्हणाले, की औरंगाबाद येथे पासपोर्ट कार्यालय व्हावे अशी सर्वांची मागणी होती. त्या काळा तसेच प्रयत्न ही केला. त्यामुळे भाजपची सत्ता आल्यानंतर जालना येथेच पासपोर्टचे कार्यालय आजपासून सुरू करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाने उडे देश का आम आदमी’ धोरणांतर्गत सामान्य नागरिकांनाही पासपोर्ट सुविधा दिली जात आहे. तसेच  राज्यातील जळगाव, कोल्हापूर, नांदेड यासह महाराष्ट्रातील बंद पडलेली विमानतळे पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे देशातील उद्योजकांना यावर्षी 900 नवीन विमाने खरेदीचा विदेशी कंपनीशी करार केला आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये देशांतर्गत विमानसेवा कमी दरामध्ये नागरिकांना उपलब्ध होणार आहे, असे ही श्री. दानवे यांनी यावेळी नमुद केले.

Web Title: jalna news new passport office in jalana and raosaheb danve