सप्तश्रृंगी गडाची तहाण भागविणाऱ्या भवानी तलावाचे जलपूजन

Jalpujan of Bhavani Lake at Saptashrungi fort vani nashik
Jalpujan of Bhavani Lake at Saptashrungi fort vani nashik

वणी (नाशिक):  सप्तश्रृंगी गड ग्रामस्थांबरोबरच लाखो भाविकांची तहान भागवणाऱ्या भवानी तलाव गेल्या दीड महीन्यापासून ओसंडून वाहात असून ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी जलपूजन केले.

सप्तश्रृंगी गड गाव व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांना लागणाऱ्या पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी भवानी पाझर तलावातून पाणी पुरवठा केला जातो. दरवर्षी उन्हाळ्यात पाझर तलाव पाणी उपसा व तलावाच्या गळतीमुळे तळ गाठत असल्यामुळे ग्रामस्थांबरोबरच भाविकांनाही दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शासन दरबारी पाठपूरावा करीत भवानी तलावाची गळती रोखण्यासाठी शासनाने २ कोटी ३९ लाखांचा निधी उपलब्ध करुन देत मे महिन्यात तलावाचे गळती रोखण्याचे काम पूर्ण झाले अाहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसामूळे भवानी तलाव तुडुंब झाला असून गळतीच्या रोखण्याच्या कामामुळे गडावर आता वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा राहाणार आहेे.

त्यामुळे अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाणीटंचाईचा अतिशय संवेदन समस्या व गडावरील सर्वच घटकांना मानसिक, शारीरीक, आर्थिक झळापासून सुटका झाली आहे. दरम्यान आज ता. २९ गडावरील महादेव मंदीर मठाचे महंत विष्णूदास महाराज, उपसरपंच राजेश गवळी,  नंदू व्हरगल, निलेश पाटील, राजेंद्र अष्टेकर,  संजय राऊत, गणेश राऊत, अनिल बेनके, उमेश मिस्रा, विकी राय, प्रकाश कडवे, धनेश गायकवाड, स्वप्निल पवार, शांताराम गवळी, गोपीनाथ तांबेकर आदी ग्रामस्थांनी भवानी तलावाचे जलपूजन केले. दरम्यान गडास पाणी पूरवठा करणाऱ्या आठवडाभरात दोन विद्युत पंप जळाल्यामुळे गडावर आठ दिवसांपासून कुत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. विद्युत पंप दुरस्तीचे काम पूर्ण झाल्याने उद्या पासून गडावर सुरळीत पाणी पूरवठा होणार असल्याचे उपसरपंच राजेश गवळी यांनी सांगितले.

भवानी तलावाची गळती रोखल्यामूळे गडाचा पाणीप्रश्न तुर्तास सुटला असला तरी भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता गडावर नव्याने धरण बांधण्यासाठी पाठपुरावा करीत असून त्यासाठी गडावरील जलशुध्दीकरण केंद्राजवळील नडगी परीसराचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. - राजेश गवळी, उपसरपंच सप्तश्रृंगी गड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com