जलरंगा'तून साकारले शेतकऱ्याचे स्वप्न! 

जलरंगा'तून साकारले शेतकऱ्याचे स्वप्न! 

"जलरंगा'तून साकारले शेतकऱ्याचे स्वप्न! 
जळगाव : येथील युवा चित्रकार सचिन मुसळे यांच्या "In hop for tomorrow' या शेतकऱ्याचे उद्याचे स्वप्न प्रतिबिंबित करणाऱ्या "जलरंगा'तील चित्राची फॅब्रियानो एकविरेलो (इटली) येथील प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. 
ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून "वॉटर कलर'मध्ये काम करणाऱ्या चित्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे चित्रप्रदर्शन भरवीत असते व चित्रकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. सचिन मुसळे गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेच्या प्रवेशासाठी प्रयत्न करीत होते. 25 ते 29 एप्रिल 2019 दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनात भारतातून ख्यातनाम चित्रकार मिलिंद मुळीक, प्रफुल्ल सावंत, संजय देसाई, विक्रांत शितोळे यांच्याही कलाकृतींचा समावेश आहे. याआधी मुसळे यांनी पेन्सिल्व्हेनिया, आयडब्ल्यूएस अल्बेनिया, सॅंडिगो वॉटर कलर आर्ट सोसायटी आदी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चित्रप्रदर्शनात सहभाग नोंदवून आपल्या चित्रांची वाहवा मिळविली आहे. निवड झाल्याबद्दल कलाक्षेत्रातील मान्यवरांकडून मुसळे यांचे विशेष कौतुक केले जात आहे. 

काय आहे या चित्रात? 
या चित्रात एक शेतकरी त्याच्या बैलांसोबत नांगरणी करताना दाखविण्यात आला आहे. हिरव्या रंगाची पार्श्‍वभूमी हेच या चित्राचे वेगळेपण आहे. त्या शेतकऱ्याला आपले उद्याचे स्वप्न नक्कीच सफल होईल, ही आशा त्यात जाणवते. त्यातील पार्श्वभूमीचा आल्हाददायक वातावरणाचा परिणाम ज्या पद्धतीने रंगविण्यात आला आहे, ते बघून मुसळे यांचे "जलरंगा'तील प्रभुत्व स्पष्ट जाणवते. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com