गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजेनेला प्रतिसाद

सुधाकर पाटील
रविवार, 29 एप्रिल 2018

अति रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतजमीन नापिक होतांना दिसत आहे. त्यामुळे शेतकर्याना गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत धरण, तलाव, नालाबांध मधील गाळ शेतात टाकण्याची संधी आहे. जास्तीत जास्त शेतकर्यानी याचा लाभ घ्यावा. पाचोरा-भडगाव तालुक्यात शेतकरी यासाठी सरसावला आहे ही चांगली बाब आहे. 
- किशोर पाटील आमदार  पाचोरा-भडगाव

भडगाव : 'गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार' या योजनेअंतर्गत भडगाव- पाचोरा तालुक्यात 17 ठीकाणी गाळ उपशाचे काम सुरू करण्यात आले आहे. उपशामुळे त्या-त्या तलावाची, धरणांची पाण्याची पातळी वाढणार आहेच, शिवाय जमिनीची पोत ही सुधारण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे या कामासांठी लोकसहभागही मोठ्याप्रमाणात मिळतो आहे. 

शासनाने गेल्या वर्षापासुन 'गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार' ही योजना कार्यान्वित केली. गतवर्षी योजनेला पाचोरा-भडगाव तालुक्यात फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र यावर्षी या योजनेला दोन्ही तालुक्यातुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पहायवास मिळत आहे.  विशेषतः प्रातांधिकारी राजेंद्र कचरे यांनी स्थानिक यंत्रणेच्या माध्यमाने या योजनेबद्दल शेतकर्यामध्ये प्रभावीपणे जनजागृतीचे केल्याने शेतकर्यानीही पुढाकार घेतला आहे. 

17 ठिकाणी कामे सुरू
पाचोरा- भडगाव तालुक्यात 17 ठीकाणी 'गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार' या योजनेअंतर्गत कामे सुरू झाले आहेत. त्यात पाचोरा तालुक्यातील  बहुळा, अग्नावती प्रकल्प तर भडगावात तांदुळवाडी, पिप्रिंहाट, पथराड, गुढे आदि ठीकाणी गाळ उपशाचे काम पुर्ण सुरू झाले आहे. सर्व ठीकाणी शेतकरी स्वखर्चाने गाळ वाहून नेत आहेत. यंदा पाण्याची फारशी उपलब्धतता नसल्याने शेतजमीनी ही पडीक आहेत.  त्यामुळे शेतकर्याना शेतात गाळ टाकणे सोयीचे झाले आहे.

यंत्राच्या इंधनाचा खर्च शासनाचा
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत गाळ उपसण्यासाठी लागणार्या यंत्राच्या इंधनाचा खर्च हा शासन करते. त्यासाठी एका ब्रासला 36 रूपये पन्नास पैसे खर्च अपेक्षित आहे. तर ज्या शेतकर्याना हा गाळ शेतात टाकायचा आहे. त्यांनी तो स्वखर्चाने वाहून न्यायचा आहे. त्यासाठी इंधन खर्च दिला जाणार नाही. पुर्वी गाळ उपशा करायचा असेल तर राॅयल्टी भरावी लागायची मात्र या योजनेअंतर्गत राॅयल्टी लागणार नाही. शेतकरी विनामूल्य गाळाची वाहतुक करू शकणार आहे. ज्यांना गाळ उपसा करायचा आहे. त्यांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. त्यानंतर संबंधित विभाग त्याला परवानगी देईल. याबरोबरच थेट ग्रामपंचायतही गावातील तलावाच्या उपशाबाबत  मागणी करू शकते. 

योजनेचा दुहेरी फायदा
शासनाने सुरू केलेल्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत धरण, तलाव, नालाबांध मधील गाळाचा उपसा होऊन त्यांची साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. पर्यायाने त्या भागातील शेतकर्याना अतिरिक्त पाण्याचा लाभ घेता येणार आहे. तर शेतकर्याना या योजनेअंतर्गत कुठलीही राॅयल्टी नभरता शेतात गाळ टाकता येणार आहे. गाळ टाकल्यामुळे जमीनीची प्रत सुधारण्यास मदत होणार आहे. 

योजनेला लोकसहभागाचा हातभार 
शासनाच्या या महत्वकांक्षी योजनेला मोठ्याप्रमाणात  लोकसहभाग मिळतो आहे.  अनेक संस्था, काही व्यक्ती, बॅकानी यांनी गाळ उपसण्यासाठी त्यांच्याकडुन यंत्र उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे शासनाची ही योजना खर्या अर्थाने लोकचळवळ बनली असल्याचे चित्र आहे. दररोज हजारो ब्रास गाळ उपसा होत आहे. ज्या गाळ उपसण्याच्या कामला पाच खर्च अपेक्षित होता. ते काम लोकसहभागामुळे पन्नास हजारात रूपयात करणे शक्य होत आहे. पर्यायाने यामुळे शासनाच्या पैशाची बचत होत आहे. 

पाचोरा व भडगाव तालुक्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत 17 ठीकाणी काम सुरू आहेत. सर्व ठीकाणी शेतकर्याकडुन उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तर काही व्यक्ती, संस्था, बॅंकेने दातृत्व दाखवले  आहे. शेतकर्यानी या योजनेचा लाभ घ्यावा.
- राजेंद्र कचरे प्रातांधिकारी पाचोरा-भडगाव
 

अति रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतजमीन नापिक होतांना दिसत आहे. त्यामुळे शेतकर्याना गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत धरण, तलाव, नालाबांध मधील गाळ शेतात टाकण्याची संधी आहे. जास्तीत जास्त शेतकर्यानी याचा लाभ घ्यावा. पाचोरा-भडगाव तालुक्यात शेतकरी यासाठी सरसावला आहे ही चांगली बाब आहे. 
- किशोर पाटील आमदार  पाचोरा-भडगाव

Web Title: jalyukta shiwar work in bhadgaon