जम्मू, लखनौ, पाटणासाठी मुंबईहून विशेष रेल्वे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नाशिक - मध्य रेल्वेने उन्हाळ्यातील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रणासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सोय केली आहे. जम्मू, लखनौ, पाटणा, गोरखपूर शहरासाठी मुंबईहून विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहेत. या गाड्यांना नाशिक रोड स्थानकाचा थांबा आहे. 

मुंबई ते जम्मू एक्‍स्प्रेस (क्र. 02171) 7 एप्रिल ते 30 जून दरम्यान दर शुक्रवारी छत्रपती शिवाजी टर्मिनसहून पहाटे पावणेसातला सुटेल. जम्मू येथून ही गाडी शनिवारी सकाळी सव्वासातला मुंबईसाठी सुटेल. मुंबईहून लखनौसाठी 4 एप्रिलपासून दर मंगळवारी दुपारी सव्वा दोनला (क्र.02111) या क्रमांकाची गाडी सुटेल. लखनौहून मुंबईसाठी दर गुरुवारी (क्र.2112) ही गाडी दुपारी तीन वाजता सुटेल. मुंबईहून छत्रपती शिवाजी टर्मिनसहून 3 एप्रिलपासून रविवारी रात्री सव्वा बाराला पाटणा येथे जाण्यासाठी गाडी सुटेल. सोमवारी रात्री आठला पाटणा येथून गाडी सुटेल. पाटणा येथे जाण्यासाठी मुंबईहून 4 एप्रिलपासून दर मंगळवारी सकाळी दहाला (2054) ही गाडी असेल. दुसऱ्या दिवशी बुधवारी पाटणातून ही गाडी मुंबईसाठी सुटेल. गोरखपूरसाठी मुंबईहून 4 एप्रिलपासून दर मंगळवारी पहाटे पाचला गाडी सुटेल. 

Web Title: Jammu, Lucknow, Patna, Mumbai special train