पूरग्रस्त भगिनींसाठी जनकल्याण समितीचे प्रेमाचे अतूट रक्षाबंधन!

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

रक्षाबंधन आला की ग्रामीण भागातल्या कुठल्यातरी खेडयावरील रक्षाबंधन आले की ग्रामीण भागातल्या कुठल्यातरी खेडयावरील कष्टकरी भगिनींना प्रेमाच्या अतुट रक्षाबंधनाचा अनुभव गेल्या १८ वर्षांपासून येतोय. तो येथील जनकल्याण सेवा समितीच्या माध्यामातून..यावेळी मात्र या भगिनींप्रमाणेच कोल्हापूर, सांगलीतील पुरात होत्याचे नव्हते झालेल्या भगिनी देखील अडचणीत असल्याने येथील जनकल्याण समितीने या भगिनींसाठी ५१ साड्या देत अनोखे रक्षाबंधन साजरे केले आहे.

येवला : रक्षाबंधन आले की ग्रामीण भागातल्या कुठल्यातरी खेडयावरील कष्टकरी भगिनींना प्रेमाच्या अतुट रक्षाबंधनाचा अनुभव गेल्या १८ वर्षांपासून येतोय. तो येथील जनकल्याण सेवा समितीच्या माध्यामातून..यावेळी मात्र या भगिनींप्रमाणेच कोल्हापूर, सांगलीतील पुरात होत्याचे नव्हते झालेल्या भगिनी देखील अडचणीत असल्याने येथील जनकल्याण समितीने या भगिनींसाठी ५१ साड्या देत अनोखे रक्षाबंधन साजरे केले आहे.

येथील जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायणमामा शिंदे आणि सहकारी सातत्याने गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असतात. गेल्या अठरा वर्षांपासून मामा व त्यांचे सहकारी खेड्यात जाऊन कष्टकरी भगिनींच्या हातून राखी बांधून घेत त्यांना भावाची भेट म्हणून साडीचोळी देतात.

दरम्यान, या महिलांच्या चेहऱ्यावरील हसू या उपक्रमामुळे फुलते. यावर्षी देखील हा उपक्रम राबविताना नारायणमामा व सहकारी थेट सांगली, कोल्हापूरच्या पूरग्रस्तांतील भगिनींसाठी भावाच्या नात्याने पुढे सरसावले आहेत. तब्बल ५१ साड्या खरेदी करून या सर्व सकाळ रिलीफ फंडाच्या मार्फत भगिनींना पाठविण्याचा यावेळी समितीने निर्णय घेतला आणि या साड्या येथील बातमीदार संतोष विंचू यांच्याकडे सुपूर्द केल्या.

यावेळी व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सकाळच्या माध्यमातून ही मदत केली जाणार असल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी नारायणमामा शिंदेंसह प्राचार्य दत्तात्रेय नागडेकर, किशोर कुमावत, रवींद्र भावसार, विजय पोंदे, सुरज करवा, सुधाकर भांबरे, गोविंदा शिंदे आदी उपस्थित होते.

“अडचणीतल्या बांधवांसाठी फुल n फुलाची पाकळी देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या साड्यातून अनेक महिलांची गरज भागली जाणार असून रक्षाबंधनाची जणू ही आमच्याकडून भेटच आहे. इतर दानशूरांनी देखील गरजूंसाठी मदतीचा हात देण्याची गरज आहे.” - नारायणमामा शिंदे, संस्थापक अध्यक्ष, जनकल्याण समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jankalyan trust help for flood victims on rakshabandhan celebration