जावेदभाईंच्या बांधिलकीतून ऊब अन्‌ क्षुधाशांती

रईस शेख
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

जळगाव - देशात आजही जात-धर्म, भाषा-प्रांतांच्या भिंती ओलांडून माणुसकी जागवणारे असामान्य व्यक्ती उदात्त भावनेतून काम करीत आहेत... असाच एक अवलिया जळगाव शहराच्या रस्त्यावर मध्यरात्री चहाचा थर्मास, बिस्किटांची थैली घेऊन निघतो... निराधारांना कडाक्‍याच्या थंडीत चहाची ऊब, तर भटक्‍या कुत्र्यांची क्षुधा भागविण्यासाठी बिस्किटे टाकतो... बोचऱ्या थंडीतील हे चित्र ‘माणुसकीची ऊब’ दर्शविणारे असेच आहे.

येथील इंदिरानगर या झोपडपट्टीच्या भागात कुटुंबासह वास्तव्यास असलेल्या जावेद शेख याकूब (वय ५०) हे बालवयापासून चहा व्यवसायात आहे. गरिबाला गरिबीची जाण असणे यातच सर्वकाही सामावले आहे. कडाक्‍याच्या थंडीत निराधार गोरगरिबांची आस्थेवाईक चौकशी करीत त्यांना गरम चहाचा घोट पाजून केवळ दुवाँ घेत जावेदभाई पुढे निघतो. 

शिक्षणावर भर
जावेद शेख यांची पत्नी शबाना, चार मुले, एक मुलगी, असे कुटुंब आहे. स्वत: अशिक्षित असताना मोठया मुलाने बारावीपर्यंत शिक्षण घेत व्यवसाय निवडला. सत्तर टक्के अपंग दुसरा मुलगा बारावीत आहे. लहान मुलगा एक बाहेती कॉलेजला, दुसरा दहावीत आणि मुलीचे शिक्षण पूर्ण होऊन दोन महिन्यांनी तिचा विवाह होणार आहे. त्यानंतर पती-पत्नी मक्का मदिनाला जाऊ, हे शेवटचे कर्तव्य असल्याचे जावेद सांगतात.

अशीही भूतदया!
मध्यरात्री निर्मनुष्य रस्त्यावर कुत्रे दिसले, तरी पोटात भीतीचा गोळा उभा राहतो. मनपासह शहरवासीयांची डोकेदुखी असणाऱ्या या मोकाट कुत्र्यांनाही जावेदभाईंच्या मायेचा लळा लागला आहे. गोविंदा रिक्षाथांबा, नेहरू चौक, बॅंक स्ट्रीट, शिवाजी पुतळा, रिंगरोड अशा ठिकाणी हे मोकाट कुत्रे त्यांच्या प्रतीक्षेतच असतात.

Web Title: Javedbhai Dog Biscuit Tea