दाभोलकर खूनप्रकरणी राज्यात 'जवाब दो' आंदोलन

भगवान जगदाळे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : 'अंनिस'चे राज्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या खून प्रकरणी अटक झालेल्या आरोपींसह त्यांच्या खुनामागील मुख्य सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. यासाठी 'अंनिस'तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर सोमवारी (ता.20) 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले. 

शासनाला डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा जाब विचारण्यासाठी व मारेकऱ्यांसह मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी ह्यासाठी येथील 'अंनिस' शाखेतर्फे निजामपूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना निवेदन देण्यात आले. 'अंनिस' शाखेतर्फे कार्याध्यक्ष मनोज भागवत, प्रधान सचिव रामचंद्र भलकारे आदींनी हे निवेदन दिले. निवेदनात जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधिक्षकांमार्फत थेट राज्य शासनापर्यंत आवाज पोहचविण्याचेही नमूद करण्यात आले आहे.

Web Title: jawab do andolan for dabholkar murder case