मालेगाव महापालिका स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे जयप्रकाश बच्छाव

प्रमोद सावंत
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मालेगाव : महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे शिवसेनेचे जयप्रकाश बच्छाव-पाटील नऊ विरुध्द पाच मतांनी विजयी झाले. एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेज यांनी शिवसेनेला मतदान केले. विरोधी महागटबंधन आघाडीचे उमेदवार शेख जाहीद जाकीर यांना अवघी पाच मते मिळाली. भाजपचे विजय देवरे सभागृहात तटस्थ राहिले तर भाजप गटनेते सुनील गायकवाड सभेला गैरहजर होते. 

मालेगाव : महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे शिवसेनेचे जयप्रकाश बच्छाव-पाटील नऊ विरुध्द पाच मतांनी विजयी झाले. एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेज यांनी शिवसेनेला मतदान केले. विरोधी महागटबंधन आघाडीचे उमेदवार शेख जाहीद जाकीर यांना अवघी पाच मते मिळाली. भाजपचे विजय देवरे सभागृहात तटस्थ राहिले तर भाजप गटनेते सुनील गायकवाड सभेला गैरहजर होते. 

स्थायी समिती सभापती निवडीसाठी आज सकाळी अकराला अपर विभागीय आयुक्त ज्याेतीबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात सभा झाली. आयुक्त संगीता धायगुडे, उपायुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव राजेश धसे व्यासपीठावर होते. सभापतीपदासाठी बच्छाव व जाहीद शेख यांचे दोनच अर्ज होते. छाननीत अर्ज वैध ठरल्यानंतर माघारीसाठी वीस मिनिटांची मुदत देण्यात आली. कोणाचीही माघार न झाल्याने दोघांमध्ये सरळ सामना झाला. यात बच्छाव यांना कॉंग्रेसची ताहेरा शेख, रियानाबानो ताजोद्दीन, अब्दुल अजीज सत्तार, नजीर अहमद इरशाद व सलीमाबी सय्यद अशी पाच, शिवसेनेचे बच्छाव स्वत:, नारायण शिंदे व कल्पना वाघ अशी तीन, तर एमआयएमचे खालीद परवेज अशी एकूण नऊ मते पडली.

महागटबंधन आघाडीचे जाहीद शेख यांना आघाडीचे पाच मते मिळाली. भाजपचे विजय देवरे सभेत तटस्थ राहिले. तर गायकवाड सभेला अनुपस्थित होते. शिवसेनेचे सर्व सदस्य भगवे फेटे परिधान करुन आले होते. कॉंग्रेस सदस्यांनाही त्यांनी भगवे फेटे घातले. निवड होताच महापालिका प्रवेशद्वाराजवळ शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल ताशे वाजवत जल्लोष केला. मनपा प्रवेशद्वारापासून ते ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत समिती सदस्यांसह उपमहापौर सखाराम घोडके, नगरसेवक राजाराम जाधव, अविष्कार भुसे, भरत देवरे, अभिजित पगार, प्रमोद पाटील, राजेश अलिझाड आदींसह बहुसंख्य सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी बच्छाव यांचे अभिनंदन केले.

महिला बालकल्याण समिती सभापतीपदी एमआयएमच्या सादिया लईक हाजी
महापालिकेत कॉंग्रेस, शिवसेना व एमआयएम या मित्र पक्षांची युती आहे. युती करतांना झालेल्या तहाप्रमाणे प्राारंभी शिवसेनेला उपमहापौरपद देण्यात आले. यानंतर प्रथम वर्षाचे स्थायी समिती सभापती पद कॉंग्रेसकडे तर दुसऱ्या वर्षी शिवसेनेला संधी असे निश्‍चित झाले होते. कॉंग्रेसने दिलेल्या शब्दाला जागत शिवसेनेला स्थायी सभापती पद दिले. त्याचवेळी एमआयएम या मित्रपक्षाला महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद दिले. महिला बालकल्याण समिती सभापतीपदी एमआयएमच्या सादिया लईक हाजी चार मते मिळवून विजयी झाल्या.

विरोधी महागटबंधन आघाडीच्या सायराबानो मोमीन यांना तीन मते मिळाली. शिवसेनेच्या पुष्पा गंगावणे या तटस्थ राहिल्या तर भाजपच्या दिपाली वारुळे सभेला अनुपस्थित होत्या. अपर विभागीय आयुक्त ज्योतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीनला ही सभा झाली. नगरसचिव राजेश धसे यांनी मसुदा वाचन केले. श्री. बच्छाव व सादिया लईक यांचा ज्योतीबा पाटील, श्रीमती धायगुडे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दोघा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपापल्या दालनात जाऊन पदभार स्विकारला. गटनेते डॉ. खालीद परवेज यांनी सादिया लईक यांचा सत्कार केला. 

Web Title: jayprakash bacchav elected as chairman of standing committee in malegao mc