जेसीएल टी-20'बद्दल टीममध्ये प्रचंड उत्सुकता 

जेसीएल टी-20'बद्दल टीममध्ये प्रचंड उत्सुकता 

जेसीएल टी-20'बद्दल टीममध्ये प्रचंड उत्सुकता 


जळगाव,  : शहरात "आयसीसी'चे नियम लागू असलेली व "आयपीएल'च्या धर्तीवर प्रथमच "जळगाव क्रिकेट लीग टी-20' क्रिकेट स्पर्धा होत असून या स्पर्धेत सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी विविध फ्रॅन्चायझीचे आठ संघ सज्ज झाले आहेत. प्रत्येक संघाचे स्वतः:चे वैशिष्ट्य असून या संघांची धमाकेदार कामगिरी क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी ठरणार आहे. 
या स्पर्धेत विविध मालकांचे आठ संघ सहभागी होत आहे. त्यात प्रकाश चौबे यांची "मोटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स' यांची टीम तसेच, आदर्श कोठारी यांची "के के कॅन थंडर्स' टीमचा समावेश आहे. दोन्ही टीममध्ये प्रत्येक एक आयकॉन प्लेयर व अन्य गुणवत्ताप्राप्त खेळाडूंचा भरणा आहे. या प्रतिभावंत खेळाडूंच्या चमकदार कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून असेल. 
----- 
(टीम)
मोटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स संघाचे मालक प्रकाश चौबे असून आयकॉन प्लेयर शशांक अत्तरदे आहे. संघाचे प्रशिक्षक म्हणून संतोष दिलीप बडगुजर यांच्याकडे जबाबदारी असेल. त्यासोबत टीममधील अन्य खेळाडूंमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज तसेच चपळ क्षेत्ररक्षकही आहेत. या सर्व खेळाडूंच्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीची क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहे. 

स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता असून स्पर्धेत आमचा संघ सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. आयकॉन प्लेयरसह अन्य खेळाडू स्पर्धेसाठी सज्ज आहेत. त्यासाठी सर्वांचा कसून सराव सुरू आहे. ही स्पर्धा जळगावच्या क्रिकेट विश्‍वात अत्यंत महत्त्वपूर्ण व क्रीडाक्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. 
- प्रकाश चौबे (संघ मालक) 
........... 
(टीम) 
के के कॅन्स थंडर्स 

के.के. कॅन्स थंडर्स संघाचे मालक आदर्श कोठारी असून त्यांना स्वतःला क्रिकेटबद्दल प्रचंड उत्सुकता व आवड आहे. या संघात आयकॉन प्लेअर म्हणून प्रदुम्न महाजन तर संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रशांत ठाकूर यांच्याकडे जबाबदारी असेल. अन्य खेळाडूंची त्यांनी समर्थ साथ लाभेल. स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी सुरू असून विजेतेपदाचा बहुमान मिळविण्यासाठी टीम सज्ज आहे. 


जळगावात प्रथमच अशाप्रकारच्या क्रिकेट स्पर्धेचा प्रयोग होत असून तो निश्‍चितच यशस्वी ठरेल. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या स्पर्धेत आमचा संघ निश्‍चितच चांगली कामगिरी करेल. त्यासाठी आमचे प्रशिक्षक खेळाडूंची चांगली तयारी करून घेत आहेत. 
- आदर्श कोठारी (संघमालक) 
............... 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com