जेईई-मेन्सची आज ऑफलाइन परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

नाशिक  - आयआयटी, एनआयटीमध्ये अभियांत्रिकी, तंत्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी बंधनकारक असलेली जॉइंट एन्ट्रन्स एक्‍झाम (जेईई)- मेन्स ही ऑफलाइन परीक्षा उद्या (ता. 2) होत आहे. ऑनलाइन स्वरूपातील परीक्षा येत्या शनिवारी (ता. 8) व रविवारी (ता. 9) घेण्यात येणार आहे.

राज्यातील नाशिक केंद्रासह अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे व ठाणे या केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाईल.

अभियांत्रिकी महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांसाठी राज्यस्तरावरील "सीईटी'द्वारे प्रवेश दिला जाणार आहे. मात्र इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमधून अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील जेईई- मेन्स ही परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा केंद्रीय शिक्षा बोर्डातर्फे घेतली जाते.
जेईई ऍडव्हान्स्डसाठी 2 मेपासून अर्जाची मुदत जेईई-मेन्सचा निकाल 27 एप्रिलला लागेल. पात्रताधारक विद्यार्थी जेईई-ऍडव्हान्स्ड परीक्षेसाठी 28 एप्रिलला सकाळी दहापासून ते 2 मे रोजी सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाइन स्वरूपात नोंदणी करू शकतील. या मुदतीत नोंदणी करणे शक्‍य न झाल्यास 3 व 4 मे असे दोन दिवस विलंब शुल्कासह नोंदणी करण्याचा अंतिम पर्याय विद्यार्थ्यांना खुला असेल. 10 ते 21 मेदरम्यान परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. 21 मे रोजी दोन सत्रांत जेईई-ऍडव्हान्स्ड परीक्षा घेतली जाईल.

Web Title: jee main offline exam