जेईई मेन्सच्या अर्जास 16 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

नाशिक - जॉइंट एंट्रन्स एक्‍झाम (जेईई) मेन्स 2017 परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून, इच्छुक विद्यार्थी 16 जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतील. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 17 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी 2 जानेवारीपर्यंतच अखेरची मुदत असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली होती. मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांनीही सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

आयआयटी, एनआयटींसह अन्य राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्‍यक असलेल्या जेईई परीक्षेचा पहिला टप्पा जेईई मेन्स ही परीक्षा आहे. यात पात्रता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई ऍडव्हान्स परीक्षा देता येते. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयात सीईटीद्वारेच प्रवेश दिले जाणार असले तरी, आयआयटी, एनआयटी व यांसारख्या संस्थांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जेईई मेन्स परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन www.jeemain.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्‍यक आहे.

Web Title: JEE Mains exam application date postponded to 16 January