पाणी शुद्धीकरणासाठी अंगणवाड्यांना 'जीवनड्रॉप'

Jeevan Drop for water purification
Jeevan Drop for water purification

निजामपूर-जैताणे (धुळे) : गावातील बालकांसह महिला व ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी गावातील अंगणवाडी सेविकांमार्फत 'जीवनड्रॉप'चे वितरण झाले. तत्पूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संजय खैरनार यांच्या हस्ते गावातील सर्व अंगणवाड्यांच्या अंगणवाडी सेविकांना 'जीवनड्रॉप'चे वाटप करण्यात आले.

यावेळी ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे, नवल खैरनार, यादव भदाणे, उत्तम पाटील, योगेश बोरसे, प्रदीप भदाणे, शाम बोरसे, शिक्षक पतपेढीचे व्हा. चेअरमन रवींद्र बोरसे आदी उपस्थित होते. अंगणवाडी सेविका संगीता खैरनार, सुनीता खैरनार, योगिता खैरनार, मालती जाधव, नलिनी जाधव, वंदना जाधव, शोभा चव्हाण, मनीषा पाटील, श्रीमती पवार, श्रीमती शेख, सावळे, सोनवणे आदींना सरपंच संजय खैरनार यांच्या हस्ते 'जीवनड्रॉप'चे वाटप झाले. दरम्यान शिक्षक पतपेढीचे व्हा.चेअरमन रवींद्र बोरसे यांचाही यावेळी ग्रामपंचायतीतर्फे सत्कार झाला. सरपंच खैरनार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार यांनी सर्वांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com