जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचा उद्यापासून राज्यव्यापी संप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

नाशिक - नागरी व ग्रामीण पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या सेवा सवलतींची जबाबदारी राज्य सरकारने घेत यापूर्वी दिलेल्या आश्‍वासनांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रविवारी (ता. 5) मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे.

या संपामुळे जिल्ह्यातील 120 गावांचा पाणीपुरवठा विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. या पाणीपुरवठ्याची जबाबदारी प्राधिकरणच्या पावणेदोनशे कर्मचाऱ्यांवर आहे. प्राधिकरणचे राज्यात 15 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तिवेतनाची जबाबदारी राज्य सरकारने घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी दीड वर्षापूर्वी संप केला होता. त्या वेळी दिलेली आश्‍वासने कागदावरच आहेत. त्यामुळे कृती समितीने बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

Web Title: jeevan pradhikaran employee strike