सराफी पेढ्या गजबजल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

नाशिक - इंधन दरवाढीसह महागाईचा दणका, टंचाई स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. १८) दसरा- दिवाळी खरेदीचा जेमतेम उत्साह होता. आकर्षक विक्री योजनांमुळे सायंकाळनंतर ग्राहक खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचे चित्र होते. त्यात लग्नसराईसाठी  वेढे, नवरीच्या दागिन्यांना पसंती असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

पितृपक्षापासून मंदी असलेल्या बाजाराला दिवाळीचे वेध लागले आहेत. शेअर मार्केटमधील अस्थिरता, गृहबांधणी क्षेत्रावर मंदीचे सावट. यामुळे महिलांसह लहान गुंतवणूकदारांचा हक्काचा पर्याय असलेला सोन्या- चांदीचा बाजार दुपारपर्यंत थंडच होता. दसरा असताना सोन्याचे दर साधारण ३१ हजार ५०० पर्यंत होते. दीडशे ते दोनशे रुपयांनी दर कमी असल्याने त्याचा दुपारपर्यंत बाजारावर परिणाम दिसला नाही. दुपारी साडेचारनंतर पेढ्यांवर खरेदीसाठी लोक येऊ लागले.

सकाळी उत्साह नव्हता. सायंकाळपासून गर्दी वाढली. १२ डिसेंबरनंतर विवाह मुहूर्त आहेत. त्यामुळे विवाहाच्या खरेदीचा उत्साह होता. त्यात गळ्यातील हार, कानाचे प्रकार, मणीमंगळसूत्राची विक्री झाली.  
- राजेंद्र दिंडोरकर, सराफ व्यावसायिक

लग्नसराईचा प्रभाव
डिसेंबरअखेर लग्नसराई सुरू होत आहे. दसरा-दिवाळीच्या सोने खरेदीवर प्रामुख्याने लग्नसराईचा प्रभाव दिसला. सराफी पेढ्यांच्या ऑनलाइन खरेदीसह विविध सवलत, योजनांची रेलचेल होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मदत झाली. लग्नसराईतील खरेदी आताच उरकरण्यामुळे सायंकाळनंतर पेढ्यांवर ग्राहकांचा राबता वाढत गेला.

Web Title: Jewellery Shop Dasara Vijayadashami