जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या जान्हवी मंजुळेची राज्यस्तरावर निवड

Jijamata Girls High School Janhavi Manjule elected on the state level
Jijamata Girls High School Janhavi Manjule elected on the state level

सटाणा : येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूलमधील ५० हून अधिक विद्यार्थिनींनी विविध स्पर्धांसह क्रीडा प्रकारात उज्वल यश मिळविले आहे. जान्हवी मंजुळे या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली असून क्रीडा स्पर्धांमधील विद्यार्थिनींची विभागीय व जिल्हास्तरावर निवड झाली आहे. 

नाशिक येथे आयोजित विभागस्तरीय विज्ञान मेळाव्यात जान्हवी मंजुळे हिच्या 'औद्योगिक क्रांती : आपण तयार आहोत का ?' या विषयावरील सादरीकरणास प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळे तिची पुणे येथे येत्या दोन दिवसात होणाऱ्या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी निवड झाली असून या स्पर्धेत हि नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिला विज्ञान शिक्षिका श्रीमती एस. जे. पवार, एम. बी. सोनवणे, वाय. एन. पवार, जी. बी. भामरे, ए. एन. पाटील, आर. डी. आहेर, पी. आर. पाटील, के. आर. देवरे, सी. ए. जाधव आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. आज गुरुवार (ता. ६) ला जान्हवी पुणे येथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना झाली असून शाळेतर्फे प्राचार्या एस. बी. मराठे यांच्या हस्ते तिला शुभेच्छा देण्यात आल्या.

नाशिक येथील छत्रपती शिवाजी स्टेडीअममध्ये आयोजित जिल्हास्तरीय १४ व १७ वर्षे आतील क्रीडा स्पर्धेत विद्यालयातील मुलींनी सहभाग घेतला होता. कॅरमच्या १७ वर्षे वयोगटातील प्रकारात भाविका भदाणे या विद्यार्थिनीने जिल्ह्याचे अजिंक्यपद मिळविले. तर कॅरमच्या १४ वर्षे वयोगटातील मुली १ व २ प्रकारात प्रियंका सोनवणे, मानसी मांडवडे व सोनाली अहिरे यांनी अंतिम सामन्यात विजय मिळविले. या सर्व विद्यार्थिनींची विभागीय स्तरावरील कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

सटाणा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती प्रकारात प्रतीक्षा भामरे व सोनाली अहिरे यांनी अजिंक्यपद मिळविल्याने त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. डांगसौदाणे (ता. बागलाण) येथे आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विद्यालयाच्या संघाने स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. शाळेच्या व्हॉलीबॉल संघाने लखमापूर (ता. बागलाण) येथे आयोजित तालुकास्तरीय १४ वर्षे आतील व्हॉलीबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविल्याने शाळेच्या संघाची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थिनी खेळाडूंना क्रीडाशिक्षक एस. एन. सोनवणे, एस. डी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक डॉ. प्रशांत देवरे, प्राचार्या एस. बी. मराठे, उपमुख्याध्यापक बी. ए. निकम, पर्यवेक्षिका बी. बी. सावकार, एस. जे. देवरे यांच्या हस्ते या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com