जिजामाता गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

सटाणा - येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ७५ टक्के लागला. हेमांगी महाजन (७८.३० टक्के) या विद्यार्थिनीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रथम क्रमांक मिळविले असून आज बुधवार (ता.१३) रोजी यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.

महाविद्यालयातील एकूण २२६ विद्यार्थिनी परीक्षेस प्रविष्ठ झाल्या होत्या. त्यापैकी १६५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून रोहिणी दात्रे (७५.८४ टक्के) द्वितीय, रोहिणी मांडवडे (७३.३८ टक्के) तृतीय, निर्मला चौधरी (७३) चतुर्थ व वैशाली चौधरी (७२.४६ टक्के) पाचवा यांनी पाहिया पाच क्रमांकात स्थान मिळविले. शालेय समितीचे अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी व माजी नगराध्यक्षा उत्तरा सोनवणे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थिनींना गुणपत्रक वाटप करून गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्या एस. बी. मराठे, उपप्राचार्य एस. जी. भामरे, के. एस. हिरे, डी. जे. गायकवाड, एम. आर. पाटील, आर. जी. सोनवणे, एम. एम. निकम, एस. एस. पवार, पी. जी. जाधव आदी शिक्षक उपस्थित होते. 

Web Title: Jijamata Girls' junior college honors successful students of Class XII

टॅग्स