जिल्ह्यातील 7/12 उतारे झाले हॅंग 

जिल्ह्यातील 7/12 उतारे झाले हॅंग 

जिल्ह्यातील 7/12 उतारे झाले हॅंग 

जळगाव :  जिल्ह्यातील सातबारा उतारा तयार करणारे संगणकीय सर्व्हर बंद पडल्याने 
शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना 7/12 उतारे मिळत नाही. यामुळे सातबारा उताऱ्याशिवाय अनेक कामे प्रलंबित आहेत. आतापर्यंत सर्व्हर अतिशय स्लो होते. मात्र तेही आता बंद पडल्याने तलाठ्यांनी डीएससी तहसील कार्यालयात तहसीलदारांकडे जमा केल्या आहेत. यामुळे उद्यापासून (20 मार्च) एकही सातबारा उतारा मिळणार नाही. यामुळे खरेदी-विक्रीचे कोट्यवधींचे व्यवहार अडकून पडणार आहेत. 
जिल्ह्यात सातबारा संगणकीकरणाचे सर्व्हर गेल्या महिनाभरापासून स्लो सुरू होते. एका तासाला एक असा सातबारा उतारा त्याद्वारे निघत होता. मात्र, तलाठी तशाही परिस्थितीत ते काम करीत होते. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही सर्व्हर जलदगतीने सुरू झालेले नाही. यामुळे आज सर्वच तालुक्‍यांतील तलाठ्यांनी आपापल्या तहसीलदारांकडे डीएससी जमा करून सातबारा उतारे देण्याचे काम बंद करीत असल्याचे जाहीर केले. या गैरसोयीला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचे सांगण्यात आले. 

उतारे बंद; आता फक्त निवडणुकीचे काम 
सातबारा उतारे देण्याचे काम बंद केल्यानंतर निवडणुकीचे काम, दुष्काळ अनुदान वाटप, पीएम किसान योजनेची काम सुरू राहतील. असे निवेदन जळगाव तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, उपाध्यक्ष एम. एस. बाविस्कर, कार्याध्यक्ष एल. व्ही. बाविस्कर, सचिव आर. पी. अहिरे आदीनीं आज निवासी नायब तहसीलदार सावळे, सातपुते यांना दिले आहे. 

संगणकीय सातबारे उतारे "क्‍लाऊड' सर्व्हरवर टाकण्यात येणार आहे. अनेक दिवसांपासून सध्याचे सर्व्हर सुरू होते. याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच सर्व्हरच्या स्पीडची अडचण दूर होईल. 

- गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी, जळगाव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com