"हतनूर'मधील जिवंत  पाणीसाठा शून्यावर 

"हतनूर'मधील जिवंत  पाणीसाठा शून्यावर 

"हतनूर'मधील जिवंत 
पाणीसाठा शून्यावर 

रावेर : जळगाव, भुसावळ तालुक्‍यासह जिल्ह्यातील शंभर गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या हतनूर मध्यम प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा मागील पाच वर्षांत आज दुसऱ्यांदा संपला. प्रकल्पात मृत पाणीसाठा शिल्लक असला, तरी प्रकल्पाखालील गावांना त्याचा काहीही उपयोग नाही. परिणामी पाऊस लांबल्यास भुसावळसह अन्य ठिकाणी तीव्र पाणीटंचाई जाणवणार असल्याची स्थिती आहे. 

हतनूर प्रकल्पात आज सकाळी आठला पाणी पातळी 207.720 मीटर्स इतकी होती. एकूण पाणी साठा 133.60 दशलक्ष घनमीटर इतका आणि जिवंत पाणीसाठा अवघा 0.24 टक्के इतका होता. दुपारी चारला हा एकूण पाणीसाठा 133.15 दशलक्ष घनमीटर इतका होता. जिवंत साठ्याची आकडेवारी सांगितली गेली नाही. मात्र, उन्हाचा तडाखा पाहता आज सायंकाळपर्यंत हा अवघा पाव टक्के जिवंत पाणीसाठाही संपला आहे. 

भुसावळला टंचाई जाणवणार 
आता जिवंत पाणीसाठा संपल्याने प्रकल्पाचे सर्व दरवाजे पूर्ण उघडल्यावरही पाणी बाहेर पडत नाही. यामुळे भुसावळ आणि अन्य शहरांसाठी आवर्तन सोडता येणार नाही. शिल्लक पाणीच काटकसरीने वापरावे लागणार आहे. 

गाळाकडे दुर्लक्ष 
हतनूर प्रकल्पाची एकूण क्षमता 388 दशलक्ष घनमीटर आहे. मात्र, मेरी या नाशिकच्या संस्थेने 2007 मध्ये प्रकल्पात प्रत्यक्षात 213 दशलक्ष घनमीटर इतकेच पाणी आणि उर्वरित गाळ असल्याचे सांगितले होते. तसेच प्रकल्पाच्या गाळात दरवर्षी 7 टक्के भर पडणार असल्याचे निरीक्षण नोंदविले होते. हा गाळ वाहून जावा म्हणून प्रकल्पाच्या खाली डाव्या बाजूला 4 दरवाजे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, निधीअभावी तेही रखडले आहे. जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाच्या गाळाच्या समस्येकडे लक्ष दिलेले नाही. आता प्रकल्पात पाणी कमी आणि गाळ जास्त, अशी स्थिती आहे. यावर उपाय न केल्यास लवकरच हा प्रकल्पच मृत होण्याची शक्‍यता आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com