Job Fair : नंदुरबार येथे 24 ला रोजगार मेळावा; येथे करा नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jobs

Job Fair : नंदुरबार येथे 24 ला रोजगार मेळावा; येथे करा नोंदणी

नंदुरबार : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्यातर्फे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, होळतर्फे हवेली डुबकेश्वर महादेव मंदिराजवळ, जगतापवाडी, नंदुरबार येथे शुक्रवारी (ता. २४) (Job fair on 24 feb Nandurbar news)

सकाळी साडेदहाला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा होणार असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरून नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

नोंदणी न केलेल्यांनी शिक्षण, अनुभव इत्यादी अद्ययावत माहिती भरून नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरून पोर्टलवर लॉगिन करावे.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०२५६४-२९५८०१ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त रिसे कळविले आहे.

टॅग्स :NandurbarJob Opportunity