नाहीतर ५० प्रवाशांचा जीव धोक्‍यात गेला असता....

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

पिंपळगाव बसवंत आगाराकडे सध्या ५१ बस आहेत. त्यातील बहुतांश बस वापरण्यायोग्य नाहीत. तरीही प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणन त्या बसच्या फेऱ्या सुरू आहेत. या बस किती धोकादायक झाल्या आहेत हे बुधवारच्या एका दुर्घटनेनंतर अधोरेखित झाले. पिंपळगाव आगाराची बस (एमएच 06, एस 8269) वणीच्या दिशेने ५० प्रवासी घेऊन स्थानकातून निघाली. काही अंतरावर जाताच बसचा स्टिअरिंग रॉड तुटल्याने चालकाने समयसूचकता दाखवत बस नियंत्रणात आणली व दुभाजकला धडकली. बस नियंत्रणात नसती आली तर ५० प्रवाशांचा जीव धोक्‍यात गेला असता.

नाशिक : "एसटी प्रवास, सुखाचा प्रवास' म्हणून प्रवाशांकडून परिवहन मंडळाच्या बसला प्राधान्य दिले जाते. बसही प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोचवीत असते. मात्र सुरक्षित वाटणाऱ्या महामंडळाच्या अनेक बसची अवस्था खुळखुळ्यासारखी झाली आहे. त्याचा प्रत्यय म्हणजे पिंपळगाव आगाराच्या वणीकडे जाणाऱ्या बसचा स्टिअरिंग रॉड तुटल्याने 50 प्रवाशांचा जीव धोक्‍यात गेला होता. त्यामुळे पिंपळगाव आगाराच्या बसमधून प्रवास नागरिकांसाठी जीवघेणा ठरतो आहे. 

नाहीतर 50 प्रवाशांचा जीव धोक्‍यात गेला असता....

पिंपळगाव बसवंत आगाराकडे सध्या 51 बस आहेत. त्यातील बहुतांश बस वापरण्यायोग्य नाहीत. तरीही प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणन त्या बसच्या फेऱ्या सुरू आहेत. या बस किती धोकादायक झाल्या आहेत हे बुधवारच्या एका दुर्घटनेनंतर अधोरेखित झाले. पिंपळगाव आगाराची बस (एमएच 06, एस 8269) वणीच्या दिशेने 50 प्रवासी घेऊन स्थानकातून निघाली. काही अंतरावर जाताच बसचा स्टिअरिंग रॉड तुटल्याने चालकाने समयसूचकता दाखवत बस नियंत्रणात आणली व दुभाजकला धडकली. बस नियंत्रणात नसती आली तर 50 प्रवाशांचा जीव धोक्‍यात गेला असता. 
 
Image may contain: sky and outdoor
पिंपळगाव बसवंत : निफाड रस्त्यामुळे नादुस्त झालेल्या बस दुरुस्तीसाठी आगारात उभ्या आहेत.

निफाड-पिंपळगाव रस्त्याने केला बसचा खुळखुळा 
बुधवारच्या दुर्घटनेप्रमाणे पिंपळगाव आगाराच्या बहुतांश बस दुरवस्थेत आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे पिंपळगाव-निफाड हा मार्गच शिल्लक राहिला नसून खड्ड्यांची सर्वाधिक किंमत पिंपळगाव बस आगाराला मोजावी लागत आहे. पिपळगाव आगाराच्या बसच्या दिवसभरात बारा फेऱ्या होतात. क्षमतेपेक्षा अधिक गर्दी व त्यात खड्ड्यांना वर्दी द्यावी लागत असल्याने बसचा अक्षरशः खुळखुळा होत आहे. स्प्रिंग, पाटे तुटणे हे नित्याचे झाले आहे. या मार्गावरून बस घेऊन जाणाऱ्या चालकाला कोणता खड्डा टाळावा हा प्रश्‍न असल्याने बस दणके खात प्रवाशांना पोचविते. 

देखभाल व दुरुस्तीवर कधी नव्हे एवढा खर्च वाढला

निफाड-पिंपळगाव रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे पिंपळगाव आगाराच्या बस नादुस्त होत आहेत. वारंवार स्पेअरपार्ट बदलावे लागत आहेत. देखभाल व दुरुस्तीवर कधी नव्हे एवढा खर्च वाढला आहे. खड्ड्याचा रस्ता असला तरी प्रवासी वाहतूक थांबविता येत नसल्याने आमच्यासाठी "इकडे आड तिकडे विहीर' अशी अवस्था झाली आहे. - प्रशांत गुंढे, आगारप्रमुख, पिंपळगाव बसवंत 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The journey to Pimpalgaon Agar bus is life-threatening Nashik News Marathi News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: