जुन्नर पाटबंधारे विभागाचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय व्हावे - पांडुरंग पवार 

जुन्नर पाटबंधारे विभागाचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय व्हावे - पांडुरंग पवार 

आळेफाटा - जुन्नर तालुका लोकसंख्या व भौगोलिक दृष्ट्या मोठा असल्याने, जुन्नर येथे पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत छोटे पाटबंधारे विभागाचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय व्हावे अशी मागणी, नुकतीच जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

जुन्नर तालुका लोकसंख्या व भौगोलिकदृष्ट्या मोठा असून, तालुक्याची लोकसंख्या सन २०११ च्या जणगणनेनुसार ३ लाख ६७ हजार ९८७ इतकी आहे, तर तालुक्याचे क्षेत्रफळ १ हजार ३८४ चौरस किलोमीटर आहे. पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत  छोटे पाटबंधारे विभागाचे सध्या आंबेगाव - जुन्नर असे कार्यालय असून, याचे मुख्यालय सध्या आंबेगाव (घोडेगाव) येथे आहे. जुन्नर तालुका पुण्यापासून जवळपास १०० किलोमीटर अंतरावर आहे. तालुक्याची पूर्व - पश्चिम लांबी शंभर किलोमीटरच्या जवळपास आहे. जुन्नर तालुक्यात  एम. आय. डी. सी. नसल्याने शेतकरी वर्ग १०० टक्के शेतीवरच अवलंबून आहे. तालुक्यात वडज, माणिकडोह, येडगाव, पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी अशी ५ मोठी धरणे आहेत. तसेच मीना शाखा कालवा, कुकडी डावा कालवा, पिंपळगाव जोगा कालवा, चिल्हेवाडी बंदिस्त पाईपलाईन (काम पूर्ण होणे बाकी) असे चार कालवे आहेत. जुन्नर तालुक्यात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे - ३८ (सिंचन क्षमता १ हजार ४०५   हेक्टर), वळण / साठवण बंधारे - १२९ (सिंचन क्षमता - २ हजार ९२४ हेक्टर), पाझर तलाव - ३७, गावतलाव - १८ असून, (सर्वेक्षण झालेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे - ११, साठवण बंधारे - ४१, तर पाझर तलाव - १०) आहेत. या सर्व बाबींचा विचार करता जुन्नर येथे पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत छोटे पाटबंधारे विभागाचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय होणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान पुणे जिल्हा परिषदेमार्फत तसा रितसर प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केलेला असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान याबाबतचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री राम शिंदे, तसेच महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना पाठविण्यात आले असल्याचे पांडुरंग पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com