शिवछत्रपती पुरस्कार मानकरी कबड्डी महर्षी दौलतराव शिंदे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

अमोल खरे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

मनमाड  : कबड्डीची पंढरी म्हणून मनमाड राज्यात अग्रेसर आहे आणि याच 'कबड्डी पंढरीचा संत' असलेले शिवछत्रपती पुरस्कार मानकरी कबड्डी महर्षी दौलतराव शिंदे यांचे आज वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले महाराष्ट्र कबड्डी क्षेत्रात दौलतराव शिंदे हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते उत्कृष्ठ कबड्डी संघटक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला नाशिक जिल्हा कबड्डी संघटना स्थापनेत सिंहाचा वाटा असलेले आणि महाराष्ट्राची कबड्डी खरी तांत्रिकदृष्ट्या बहरली ती दौलतराव शिंदे यांच्यामुळेच...दौलतरावांच्या जाण्याने कबड्डी क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

मनमाड  : कबड्डीची पंढरी म्हणून मनमाड राज्यात अग्रेसर आहे आणि याच 'कबड्डी पंढरीचा संत' असलेले शिवछत्रपती पुरस्कार मानकरी कबड्डी महर्षी दौलतराव शिंदे यांचे आज वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले महाराष्ट्र कबड्डी क्षेत्रात दौलतराव शिंदे हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते उत्कृष्ठ कबड्डी संघटक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला नाशिक जिल्हा कबड्डी संघटना स्थापनेत सिंहाचा वाटा असलेले आणि महाराष्ट्राची कबड्डी खरी तांत्रिकदृष्ट्या बहरली ती दौलतराव शिंदे यांच्यामुळेच...दौलतरावांच्या जाण्याने कबड्डी क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

महाराष्ट्र कबड्डी क्षेत्रात बुवा साळवींच्या कबड्डीच्या प्रचार व प्रसार प्रवाहात सतत बुवांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करणारे कबड्डीची तांत्रिक बाजू उत्कृष्ठपणे सांभाळणारी व्यक्ती म्हणून ज्यांच नाव कबड्डी क्षेत्रात आदराने घेतले जाते ते म्हणजे दौलतराव शिंदे होय. दौलतरावांच्या निधनाने कबड्डीचा चालता बोलता इतिहास आपल्यातुन निघून गेला दौलतरावांची शहराच्या क्रीडाक्षेत्रासंदर्भात शेवटची मुलाखत घेण्याचा योग मला मिळाला. (१९ मार्च २०१८)...कबड्डी खरी तांत्रिकदृष्ट्या बहरली ती दौलतरावांमुळे, बुवांच्या बरोबरीने कबड्डी संघटनेत काम करीत असताना बुवांना कबड्डी संदर्भात योग्य सल्ला देण्याचे काम दौलतरावांनीच केले. कबड्डीचा पाया नाशिक जिल्ह्यात रोवलाच परंतु महाराष्ट्रात व  देशपातळीवरही कबड्डीची पताका हाती धरली. कबड्डी क्षेत्रातील खेळाडू, पंच, तांत्रिक समिती सभासद, नियम समिती सभासद ह्या भूमिकांबरोबर कबड्डीतील कार्यकर्ता व त्यातूनही संघटक ही अत्यंत मोलाची भूमिका त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडली.

आपले अख्खे आयुष्य त्यांनी कबड्डीसाठी दान केले महाराष्ट्राच्या कबड्डीने आज फार मोठी जी झेप घेतली त्याची एक कबड्डीमहर्षी बाजू बुवा साळवी तर दुसरी बाजू कबड्डीमहर्षी दौलतराव शिंदे म्हणावे लागेल. मनमाड शहर हे पूर्वीपासून कबड्डीची पंढरी म्हणून राज्यात अग्रेसर आहे. याच मनमाडमध्ये दौलतरावांना वडिलांकडून व तत्कालीन क्रीडाशिक्षकांडून कबड्डीचा वारसा मिळाला, १९४५ च्या दरम्यान मनमाड शहरातील आझाद नवजवान मंडळ, ज्ञानबालोपासक मंडळ, व नवजवान क्रीडा मंडळ यांनी कबड्डीची मुहूर्तमेढ रोवली. १९५५ साली नवजवान क्रीडा मंडळातून दौलतरावांनी आपली सुरवात केली. कबड्डीची मैदाने गाजवली १९६४ साली मनमाडमध्ये नवजीवन क्रीडा मंडळाच्या माध्यमातून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरविण्यापासून ते ती यशस्वी करण्यापर्यंत दौलतरावांचे कौशल्य पाहून कबड्डीचे सर्वेसर्वा शंकरराव साळवी, वसंतराव कोलगावकर, मोरेश्वर गावंड इत्यादींनी त्यांच्यावर नाशिक जिल्ह्याच्या कबड्डीची धुरा सोपवली.

पूर्वी संघटनेचा कारभार मालेगाव येथून निशांत स्पोर्ट क्लबचे मोहम्मद इस्माईल हे बघत ही संघटना मालेगावहून हलवून १९६४ पासून मनमाड येथून संघटनेचा कारभार सुरू झाला. त्यावेळी पहिले अध्यक्ष मोहम्मद इस्माईल तर संघटनेत महत्वाचे पद असलेले प्रमुख कार्यवाह म्हणून दौलतराव शिंदे यांनी नाशिक जिल्हा कबड्डी संघटनेची सूत्रे हाती घेतली. संघटनेचा कारभार चालविण्यासाठी त्याकाळी नवजवान क्रीडा मंडळाच्या उत्स्फूर्त पाठींब्याने व सम्राट क्रीडा मंडळाच्या सहाय्याने कार्यालय सुरू झाले.

डी एस राऊत, दत्ता निकुंभ, बाबुराव उटवाल, एच आय पठाण, ताहेरखा पठाण, डी बी तांबे, आरज बच्छाव, गणपतराव अहिरे, डी के पगारे अशा कित्येकांचे संघटना वाढीसाठी योगदान मिळाले. जिल्हा अजिंक्यपद व चाचणी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. दौलतरावांच्या कणखर, जिद्दी नेतृत्वाखाली जिल्हा संघटनेची प्रगती झाली. त्यातून महिला राष्ट्रीय कबड्डीपट्टू, कबड्डीसाठी वाहून घेतलेले कार्यकर्ते घडले हीच दौलतरावांची खरी कमाई होती. राज्य संघटनेत सलग २२ वर्ष संयुक्त कार्यवाहक म्हणून काम केले. १९६५ ते ९० पर्यंत भारतात अनेक ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेत तसेच एशियाड - ८२, एशियन गेम्स, साफ गेम्स व इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून उत्तम कामगिरी बजावली. राज्य तसेच अखिल भारतीय संघटनेत पंच मंडळ व पंच परीक्षा परिक्षक, तांत्रिक समिती सदस्य, नियम समितीचे निमंत्रक, पेपर्स सेटर्स, राज्य संघाचे निवड समिती सदस्य, संघ व्यवस्थापक इत्यादी विविध भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या जिल्हा संघटनांना राज्य संघटनेशी जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणून राज्यात ते प्रसिद्ध होते. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये संघटना कार्यरत नाहीत. आशा जिल्ह्यात संघटनांची पुनर्बांधणी करण्याचे जिकरीचे आणि कठीण असलेले काम त्यांनी हिरीरीने केले. कोल्हापूर, सातारा, धुळे, जालना, नगर आदी जिल्हे याचे उदाहरण आहे. रेल्वेत कामावर असतांनाही त्यांनी महाराष्ट्राच्या कबड्डीचा विकास साधण्यावर भर दिला. राज्य संघटनेत बुवांच्या बरोबरीने अतिशय महत्वाचे सहसचिव पद २५ वर्ष सांभाळले, राष्ट्रीय पातळीवर राज्य कबड्डी संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक व पंच म्हणून देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहे. दौलतराव जवळजवळ १५ वर्ष अ भा कबड्डी संघटनेच्या तांत्रिक समिती सदस्य म्हणून काम पाहिले. कबड्डीत ज्या ज्या वेळी विकासाच्या दृष्टीने नियमात बदल करण्यात आले. त्या त्या वेळी दौलतरावांनी सुचविलेल्या सूचना, दुरुस्त्या घेण्यात आल्या. राज्य कबड्डी संघटनेत विविध पदावर काम करीत असतांना राज्यापुरते मर्यादित न राहता ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा कार्यरत राहिले.

कबड्डी खेळाची तांत्रिकदृष्ट्या अद्यावत माहिती सर्वत्र दौलतरावांनीच पोहचवली कबड्डीतील नियमांवर संशोधन हा त्यांचा अवडतीचा विषय होता. सध्या अस्तित्वात असलेल्या कबड्डी नियमांचे ते एक प्रमुख शिल्पकार होत. कबड्डीसंदर्भातील नियमांमध्ये ज्या दुरुस्त्या झाल्या त्यातील बहुसंख्य दुरुस्त्या दौलतरावांनी सुचविल्या आहे. 'कबड्डी साहित्य निर्मिती' दौलतरावांच्या लेखणीतून साकारले आहे. कबड्डी सिलॅबस (इंग्रजी), आधुनिक व शास्त्रीय कबड्डी प्रशिक्षण (मराठी), कबड्डीचा इतिहास (मराठी) ही पुस्तके लिहिली आहे. विविध वर्तमानपत्रात समीक्षणपर लेख प्रसिद्ध, एकूणच त्यांचे साहित्य कबड्डी प्रशिक्षक, पंच व क्रीडाशिक्षक तांत्रिक व शास्त्रीय आधार म्हणून उपयोग होत आहे. तर कबड्डीमध्ये पाच एमफिल व तीन पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेकबड्डीच्या प्रचारार्थ त्यांनी परदेश दौरे केले कबड्डीच्या प्रचारार्थ १९८१ मध्ये जपान, मलेशिया, थायलंड, फिलिपाईन्स येथे गेलेल्या कबड्डी प्रचार चमूत त्यांचा सहभाग होता. त्यांनी आयुष्यभर कबड्डी खेळाची सेवा केली महत्वाची पदे भूषवली, दौलतरावांच्या कार्याचा गौरव म्हणून राज्य शासनाने १९९७-९८ चा शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला राज्य संघटनेत ते टेक्निकल डायरेक्टर पद देऊन त्यांचे तांत्रिक मार्गदर्शन घेतले जात होते.

उत्कृष्ट कबड्डी तज्ञ म्हणून ते भारतात ओळखले जात श्वासाच्या शेवटपर्यंत त्यांनी कबड्डीच्या विकासाचा ध्यास घेतला, पारंपरिक पद्धती बाजूला सारून स्पर्धांचे आयोजन करणे. राज्य चाचणी स्पर्धांचे स्वरूप बदलणे, पंचांची उच्चतम कामगिरी व वर्गवार श्रेणी तयार करणे. प्रशिक्षणाची सक्ती करणे आणि संघटकाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी विशेष वर्गाचे आयोजन करणे. इत्यादी बाबत विचार व्हावा अशी त्यांची इच्छा होती. नाशिक जिल्ह्यासारख्या उपेक्षित भागात दौलतरावांमुळे अनेक खेळाडू, कार्यकर्ते उदयास आले. कबड्डी संघटनेची पाळेमुळे ग्रामीण भागात रुजवली शामराव अष्ठेकर गमंतीने नेहमी म्हणायचे महाराष्ट्र कबड्डीची दौलत म्हणजे दौलतराव शिंदे मात्र आज या दौलतीला महाराष्ट्राची कबड्डी पोरकी झाली आहे.

Web Title: Kabaddi Maharshi Daulatrao Shinde passed away at 82 years of age