कल्याणी देवरे करणार ग्लोबल गोल्स परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व

kalyani
kalyani

म्हसदी (धुळे) : म्हसदी (ता.साक्री.जि.धुळे) येथील रहिवासी तथा नाशिक येथील क.का.वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयाची विद्यार्थीनी कल्याणी शरद देवरे हीची अकरा ते चौदा जानेवारी 2019 दरम्यान मलेशियाच्या क्वालालंपूर येथे होणाऱ्या जागतिक ग्लोबल गोल्स परिषदेसाठी निवड झाली आहे.

जगातील 134 देशातील विद्यार्थी परिषदेत सहभागी होणार आहेत. भारतातून महाराष्ट्रातील कल्याणी देवरे तर आंध्र प्रदेशातील आकाश चक्कपल्लीचा समावेश आहे. परिषदेत हे दोघे भारताचे प्रतिनिधीत्व करतील. ग्लोबल गोल्स जागतिक परिषदेत झिरो हंगर, नो पोवर्टी, गुड हेल्थ अॅण्ड वेल-बिईंग, अर्फोडेबल अॅण्ड क्लिन एनर्जी, डिसेन्ट वर्क अॅण्ड इकोनॉमीक ग्रोथ, इंडस्ट्री इनोवेशन अॅण्ड इंफ्रास्ट्रक्चर, क्लायमेट अ‍ॅक्शन, लाईफ बिलोव वॉटर, लाईफ आॅन लॅण्ड, क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्विलीटी, क्लिन वॉटर अॅण्ड सॅनिटेशन, रिड्यूस्ड ईनइक्विलीटीज्स, स्टेनेबल सीटीज अॅण्ड कम्युनिटीज,
रिस्पॉन्सीबल कन्जम्पशन अॅण्ड प्रोडक्शन, पिस, जस्टिस अॅण्ड स्ट्रोंग इन्स्टिटय़ूशन्स, पार्टनरशिप फोर द गोल्स, झिरो हंगर आणि जेंडर इक्वॅलीटी या सतरा विषयांवर चर्चा होणार असून त्यात कल्याणी देवरे झिरो हंगर व जेंडर इक्वॅलीटी याविषयावर देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

ग्लोबल गोल्स परिषदेविषयी कल्याणी संपर्क साधला असता 'ग्लोबल गोल्सचा उद्देश चांगला वाटल्याने ऑनलाइन अर्ज सादर केला. त्यात विविध प्रश्न करण्यात आले होते. सहभाग का घेऊ इच्छितात? 2030 पर्यंत समाजात काय बदल हवा आहे, तुम्ही घेतलेले विषय कितपत योग्य आहेत. ग्लोबल गोल्स परिषदेत सहभाग नोंदविल्या नंतर काय करणार..?आदी प्रश्न विचारल्याचे 'सकाळ'ला सांगितले.

कल्याणी सध्या नाशिक येथे डिप्लोमा करत असून प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषदेच्या दहिवेल (ता.साक्री) येथील कन्या शाळा, माध्यमिक शिक्षण नाशिक येथील म.वि.प्र.मराठा हायस्कूलमध्ये तर उच्च माध्यमिक शिक्षण आर.वाय.के.कॉलेजमध्ये झाले आहे. कल्याणी येथील विश्वेश्वर जीर्णोध्दार मंडळाचे अध्यक्ष अर्जुन सीताराम देवरे यांची नात तर जिल्हा परिषदेच्या दहिवेल येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक शरद देवरे व शिक्षिका मनिषा बच्छाव यांची कन्या आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com