वीजबिल भरण्यासाठी पंधरा पर्याय;  तरीही थकबाकी कमी होईना...! 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जुलै 2018

वीजबिल भरण्यासाठी पंधरा पर्याय; 
तरीही थकबाकी कमी होईना...! 

वीजबिल भरण्यासाठी पंधरा पर्याय; 
तरीही थकबाकी कमी होईना...! 

जळगावः वीज ग्राहकांना घर बसल्या ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मुळात ऑनलाइन बिल भरणा केंद्रासह ऑनलाइनचे पंधरा पर्याय "महावितरण'कडून उपलब्ध झाले आहेत. या पर्यायानंतरही बिल थकबाकीची रक्‍कम वाढतच असून, जिल्ह्यातील थकबाकी सातशे कोटींवर पोहोचली आहे. 
"महावितरण' वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या बिलाची आकारणी दरमहा करते. हे वीज बिल ग्राहकांना वाटप केले जाते. ग्राहकांनी वीज बिल व त्याचा तपशील "महावितरण'च्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरही पाहता येतो. वीजबिल सहजरीत्या कसे व कोठे भरावे. यासाठी महावितरणकडून ऑनलाइन व ऑफलाइनचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. बिल भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या साइटवर जाऊन या पर्यायावर ग्राहक क्रमांक टाकून बिल भरता येईल. तसेच महावितरणचे वेबसाइट व मोबाईल ऍपद्वारे नेट बॅंकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट, united payment interface - UPI या माध्यमाद्वारे वीज बिल भरता येईल. तसेच इलेक्‍ट्रॉनिक बिल पेमेंट ऍड प्रेझेंटमेंट, नॅशनल ऍटोमॅटेड क्‍लेरिंग हाउस, भारत बिल पेमेंट सिस्टिम, पेटीएम व महाऑनलाइन, बुलडाणा अर्बन को- ऑपरेटिव्ह बॅंक लि या केंद्रावर जाऊन बिल भरता येईल. 

"ऑफलाइन'चे पर्याय 
"ऑफलाइन'मध्ये इंडिया पोस्ट ऑफिस, ऑनलाइन सेंट्रलाइज्ड कलेक्‍शन सॉफ्टवेअरमधून अधिकृत वीज भरणा केंद्र आहे. याशिवाय क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटी, अर्बन को- ऑपरेटिव्ह बॅक, ऐनी टाइम पेमेंट मशिन, रोख रक्कम, धनादेश इत्यादी माध्यमातून वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून वीज ग्राहकांनी दरमहा वीज बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन "महावितरण'ने केले आहे. 

पर्याय ठरताहेत फोल 
ग्राहकांना बिल भरणा सोयीचा व्हावा, या दृष्टीने विविध पर्याय "महावितरण'कडून उपलब्ध झाले आहेत. तरीही वीजबिलांची थकबाकी वाढतच आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास थकबाकीची रक्‍कम सातशे कोटींवर पोहचली आहे. यामुळे "महावितरण'चे हे पर्याय देखील फोल ठरत आहेत. 
 

Web Title: kami