कंधाणेत रामलीला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

रोशन भामरे
शनिवार, 31 मार्च 2018

तळवाडे दिगर (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील कंधाणे येथे गावाचे आराध्य दैवत असलेल्या जगदंबा मातेच्या यात्रोत्सवानिमित रामलीला उत्सव मोठ्या उत्साहाने सुरु असून सन १९४७ साली सुरु झालेल्या रामलीला उत्साहाला यंदाच्या उत्सहात ७१ वर्ष पूर्ण झाली आहेत. गावाची ७१ वर्षाची परंपरा कायम असून सध्याच्या युवा पिढीत उत्साहदेखील मोठा आहे.

तळवाडे दिगर (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील कंधाणे येथे गावाचे आराध्य दैवत असलेल्या जगदंबा मातेच्या यात्रोत्सवानिमित रामलीला उत्सव मोठ्या उत्साहाने सुरु असून सन १९४७ साली सुरु झालेल्या रामलीला उत्साहाला यंदाच्या उत्सहात ७१ वर्ष पूर्ण झाली आहेत. गावाची ७१ वर्षाची परंपरा कायम असून सध्याच्या युवा पिढीत उत्साहदेखील मोठा आहे.

कंधाणे (ता. बागलाण) येथील गावाचे आराध्य दैवत असलेल्या जगदंबा मातेच्या यात्रोत्सवानिमित बुधवार (दि २८) पासुन रामलीला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या या उत्सवात रामलीला नाटक सादर करण्यात येते. संस्कृत चौपाई व मराठीत संभाषण या नाटकात सादर केले जाते. वाल्याचा वाल्मिकी बनल्यापासून ते रावणाचा वधापर्यंत सर्व भाग गावातील गावकऱ्यांचे तोडपाठ असून सर्व वेशभूषाचा जिवंत देखावा सादर केला जातो.

सन 1947 मध्ये कै. शंकर बैरागी नामक माणसाने लोकांना मनोरंजनाबरोबरच सर्व गावातील नागरिक एकत्र येण्यासाठी रामलीलेची मुहूर्त मेढ रोवली होती. गुढीपाडव्याच्या दिवशी विधिवत पूजा करून रामलीलेची पेंढी उभारण्यात आली. नंतर एकादशी पासून पाच दिवस रोज रात्री पाच अंकांचा कार्यक्रम साजरा केला जातो. त्याच पहिल्या दिवशी वाल्याचा वाल्मीकि व श्रावण बाळाचा वध, दुस-या दिवशी रामजन्मोत्सव, तिस-या दिवशी राम-सीता स्वंयवर, चौथ्या दिवशी सीताहरण, पाचव्या दिवशी रावणवध असा भाग सादर केला जातो व सर्व रामलीलेचे सर्व अभिनयाचे जिवंत देखावे तयार करून रामलीला नाटिका सादर केली जाते, त्यात वेशभूषा परिधान करून साबळ या वाद्याच्या ठेक्यावर नाचत असतात.

गावात रामलीला उत्सवाच्या  तयारीसाठी रामलीला उत्सव समिति व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतात व  रामलीला पाहण्यासाठी पंचक्रोशीतील प्रक्षेक मोठ्या प्रमाणात कंधाणेत येत असतात पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेरगावी गेलेली मंडळी रामलीला उत्सवात गावात डेरेदाखल होतात शेवटच्या दिवशी गावाचे  आराध्य दैवत असलेल्या जगदंबा मातेच्या यात्रात्सवानिमित्त गावात यात्रा भरते गावाच्या एकोप्यामुळे गेल्या ७१ वर्षापासुन परंपरा निर्विघ्न चालू असून रामलीला सादरीकरणाची परंपरा आज देखील त्याच उत्सहात चालूच आहे.

रामलीला उत्सवात सूत्रधार, विदुषक, गणपती, सरस्वती, राम, लक्ष्मण, सीता, भरत, राजा दशरथ, कौशल्या, कैकेयी, हनुमान, रावण, बिभिषण, अंगद, कुंभकर्ण, शूर्पणखा, वाल्या, श्रावण बाळ असे संपूर्ण रामायणातील सर्व पात्र मुखवटे घालून सादर केली जातात व १९४७ सालापासूनची परंपरा गावातील गावकऱ्यांची एकी व सुसंवादा मुले गेल्या ७० वर्षांची परंपरा त्याच उत्सहात सुरु आहे.

Web Title: Kandhane keeping tradition of celebrating Ram Leela