PHOTO : काही क्षणातच ठिणगीने रौद्ररूप धारण केले...की 'इथले' प्राचीन मंदिरही गिळले...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

पिंपळगाव शहरातील म्हसोबा चौकात शंभर वर्षांहून अधिक प्राचीन महादेवाचे कपालेश्‍वर-माणेकश्‍वर मंदिर होते. लाकडापासून उभारलेल्या मंदिरलगत सुरेश आंबेकर यांचे टेलरचे दुकान होते. बुधवारी (ता. 11) रात्री दोनच्या सुमारास टेलर दुकानातील वीजमीटरमध्ये बिघाड होऊन उडालेली ठिणगी कपड्यावर पडली. काही क्षणातच ठिणगीने रौद्ररूप धारण करीत आगीचा भडका उडाला.

नाशिक : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पिंपळगाव बसवंतचे जागृत देवस्थान असलेले कपालेश्‍वर-माणकेश्‍वर मंदिर खाक झाले. शहरातील बाजारपेठ व नागरी वस्तीत एक तास उसळलेल्या आगडोबांत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 

अशी लागली आग..

पिंपळगाव शहरातील म्हसोबा चौकात शंभर वर्षांहून अधिक प्राचीन महादेवाचे कपालेश्‍वर-माणेकश्‍वर मंदिर होते. लाकडापासून उभारलेल्या मंदिरलगत सुरेश आंबेकर यांचे टेलरचे दुकान होते. बुधवारी (ता. 11) रात्री दोनच्या सुमारास टेलर दुकानातील वीजमीटरमध्ये बिघाड होऊन उडालेली ठिणगी कपड्यावर पडली. काही क्षणातच ठिणगीने रौद्ररूप धारण करीत आगीचा भडका उडाला. टेलर दुकानातील कपडे व लाकडी मंदिर असल्याने आगडोंब उसळण्यास सुरवात झाली. व्यापारी पेठ असल्याने मेन रोडवरील दुकानाच्या रखवालदाराच्या लक्षात ही घटना आली. 

.....पण मंदिर जळून भस्मसात

पिंपळगाव ग्रामपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीचे लोट उसळत होते. अग्निशमन दलाच्या बंबाच्या तीन फेऱ्यांनंतर आगीला आटोक्‍यात आणण्यात यश आले. पण मंदिर जळून भस्मसात झाले होते. त्यात मंदिरातील पिंड व तीन मूर्ती भंगल्या. टेलर दुकानातील कपडे व मशिन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. अग्निशमन दलाचे सुनील आहिरे, बशीर शेख, दत्तात्रय सावकार यांनी शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. मंडलाधिकारी निळकंठ उगले, तलाठी चंद्रकांत पंडित यांनी दुर्घटनेचा पंचनामा केला. सरपंच अलका बनकर, उपसरपंच रुक्‍मिणी मोरे, ग्रामपंचायत सदस्य संजय मोरे, गणेश बनकर, किरण लभडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

Image may contain: outdoor

पिंपळगाव बसवंत : म्हसोबा चौकातील कपालेश्‍वर मंदिराला लागलेली आग. 

वादात अडकला जीर्णोद्धार 
शहरातील नागरिक व परिसरातील व्यापाऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या कपालेश्‍वर मंदिराचा तीन वर्षांपासून जीर्णोद्धारासाठी नागरिक व ग्रामपंचायत प्रयत्नशील होते. शंभर वर्षांपूर्वी ऍड. ध्रुव यांनी स्वमालकीची जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली होती. त्या जागेवर मंदिर व लगतचे दोन व्यावसायिक आहेत. जीर्णोद्धारासाठी अनेकदा प्रयत्न झाले, पण दोघा व्यवसायिकांच्या पुनर्वसनाचा वाद उभा राहिला. हे प्रकरण थेट न्यायालयात पोचले होते. अखेर काल दुर्घटनेत मंदिर बेचिराख झाले. महाशिवरात्री व श्रावणात मंदिरात भाविकांची गर्दी असते. येथील व्यापारीही रोज मंदिरात नतमस्तक झाल्याशिवाय कामकाजाला सुरवात करीत नसायचे. 
 

नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

हे मंदिर रात्री प्रत्यक्ष जळताना बघून वेदना झाल्या

कपालेश्‍वर मंदिरात दर्शनानंतर माझ्यासह अनेक व्यापाऱ्यांची दिवसाची सुरवात व्हायची. जागृत देवस्थान असलेले हे मंदिर रात्री प्रत्यक्ष जळताना बघून वेदना झाल्या. आगीचे स्वरूप भयावह होते. - रत्नपाल शाह, जयंत मेडिकल 

व्यावसायिकांनी सामज्यस्यांची भूमिका दाखविली असती, तर मंदिराचा जीर्णोद्धार होऊन आजचा कटू प्रसंग टाळला असता. भाविकांसाठी हा वेदनादायी प्रसंग आहे. प्रसंगी कठोर निर्णय घेऊन लवकरच मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला ग्रामपंचायत व नागरिकांच्या मदतीने सुरवात केली जाईल. - गणेश बनकर, सदस्य ग्रामपंचायत, पिंपळगाव बसवंत 

हेही वाचा > PHOTO : ऍपलचे शोरूम फोडले...सुरक्षारक्षकांचा वावर असूनही 'अशी' केली चोरांनी हिम्मत..

 हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kapaleshwar mandir fire at pimplegaon baswant Nashik Marathi News