कापशी येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

खामखेडा (नाशिक) : कापशी ता देवळा येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत देवळा पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की , देवळा तालुक्यातील कापशी येथील शेतकरी गंगाराम भिला  भदाणे (वय - ५५ ) यांनी आज शुक्रवार दुपारी साडे बाराच्या सुमारास येथील डोंगर परिसरात वनविभागातील असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

पोलिस पाटील भगवान जाधव यांनी याबाबत देवळा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आत्महत्याग्रस्त शेतकरी गंगाराम भिला भदाणे यांच्याकडे चार एकर जमीन असून, त्यांच्यावर विकास सोसायटीचे दीड लाख रुपये कर्ज असून, उर्वरित उसनवारीने त्यांनी पैसे घेतले आहेत. त्यामध्ये दुष्काळी परिस्थिती व कांद्याला भाव नाही. यामुळे ते कर्ज फेडू शकले नाही. या कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

देवळा पोलिसात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहेत.

Web Title: In Kapashi Farmers committed Suicide for Debts Issue