रानडुक्करांच्या धडकेत  कार उलटून दोन जखमी 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 जून 2018

रानडुक्करांच्या धडकेत 
कार उलटून दोन जखमी 

रानडुक्करांच्या धडकेत 
कार उलटून दोन जखमी 

जळगाव : शहादा येथून शेगावकडे जाणाऱ्या पाटील कुटुंबीयांच्या भरधाव कारपुढे रानडुक्कर आल्याने कार महामार्गाच्या बाजूला उलटली. या अपघातात महिलेसह दोघे जखमी झाले असून, नऊ महिन्यांचे बाळ मात्र सुखरूप बचावले. शहादा (ता. नंदुरबार) येथील रहिवासी प्रमोद पाटील आई-वडील पत्नी व बहिणीला घेऊन कारने (वॅगनार क्रमांक एमएच 39, जे 6530) शेगाव दर्शनाला निघाले होते. पाळधी ते बांभोरी दरम्यान राज्य महामार्गावरील तोतला पेट्रोल पंपाजवळच मध्यरात्री दीडच्या सुमारास भरधाव कारसमोर रानडुक्कर आडवे आले. चालक प्रमोद पाटील यांनी वाहन नियंत्रित प्रयत्न केला. मात्र, रानडुकराला धडक लागून कार महामार्गाच्या बाजूला जाऊन उलटली. यात शीतल गणेश पाटील (वय 38) यांना गंभीर दुखापत झाली असून, इतरांना किरकोळ मार लागला आहे. अपघात होताच महामार्गावर गस्तीला असलेल्या पथकातील पोलिस कर्मचारी चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ जखमींना मदत पुरवून त्यांना रुग्णवाहिकेने जळगावात हलविले. जखमी शीतल यांच्यावर तातडीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, इतर जखमींवर उपचार करण्यात आले. 

पोलिसांकडून मदतकार्य 
कार महामार्गावर उलटली. यावेळी एखादे वाहन मागून किंवा पुढून आले असते तर कदाचित अप्रिय घटना घडली असती. अपघातग्रस्त वाहनात नऊ महिन्याचे बाळ होते. बाळ आणि आई दोघेही सुखरूप असून, इतर किरकोळ जखमी झाले. महामार्गावर डोळ्यांदेखत मृत्यू पाहिलेल्या पाटील कुटुंबीयांनी ईश्‍वराचे आणि मदत करणाऱ्या पोलिसांचे आभार व्यक्त केले. 
 

Web Title: kar