विभागप्रमुखांना आयुक्तांपुढे  करावे लागणार "प्रेझेंटेशन' 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 मे 2018

विभागप्रमुखांना आयुक्तांपुढे 
करावे लागणार "प्रेझेंटेशन' 

विभागप्रमुखांना आयुक्तांपुढे 
करावे लागणार "प्रेझेंटेशन' 

जळगाव ः महापालिकेचे नवीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दुसऱ्याच दिवशी विभाग प्रमुखांना नोटीस पाठवली. त्यांच्याकडे असलेल्या विभागातील कामांची जबाबदारी, माहिती तसेच कर्मचाऱ्यांची संख्या आदी सविस्तर माहिती ही पॉवर पॉइंटद्वारे सादरीकरण करण्याच्या सूचना केल्या आहे. 
आयुक्त श्री. डांगे यांनी सोमवारी विभाग प्रमुखांची ओळखपरेड व जबाबदारीची माहिती जाणून घेतली. त्यातच आज विभाग प्रमुखांकडे असलेल्या जबाबदारी, कामाचे स्वरूप तसेच कर्मचाऱ्यांची संख्या आदी माहिती पॉवर पाईंटद्वारे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहे. सादरीकरणासाठी प्रत्येक विभागप्रमुखांना पंधरा मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. 30 मे ते 4 जून दरम्यान सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत सादरीकरणातून आयुक्त माहिती घेणार आहेत. पहिल्या दिवशी 8 विभागांची माहिती घेतली जाणार असून अभिलेखा विभाग, घरकुल विभाग, जनसंपर्क विभाग, क्रीडा विभाग, बालवाडी विभाग, महिला व बालकल्याण विभाग, नगरसचिव व मलेरिया विभागाचा समावेश आहे. 

31 विभागांचा आढावा 
आयुक्त डांगे चार दिवसात 31 विभाग प्रमुखांकडून आढावा घेणार आहे. 31 मे ला शिक्षण मंडळ, ग्रंथालय विभाग, दवाखाना विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग, भांडार विभाग, लेखा परीक्षण विभाग. 1 जून ला नगररचना विभाग, खुला भूखंड विभाग, मार्केट वसुली विभाग, प्रभाग समिती कार्यालय 1 ते 4 सह इतर विभाग. 4 जूनला आस्थापना विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रमुख कार्यालय, लाइट विभाग, वाहन विभागासह जन्म-मृत्यू नोंदणी विभागाचा आढावा घेतला जाणार आहे. 
 

Web Title: karave