Dhule News : विविध मागण्यांसाठी करणी सेनेतर्फे सलग 3ऱ्या दिवशी उपोषण सुरूच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule: Karni Sena office bearers, farmers on hunger strike in front of Cumaine Club for various demands

Dhule News: विविध मागण्यांसाठी करणी सेनेतर्फे सलग 3ऱ्या दिवशी उपोषण सुरूच..

Dhule News: पवनऊर्जा कंपनीचे टॉवर उभारण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सुझलॉन कंपनीने करावी. सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी. मुदत संपलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी परत मिळाव्यात यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय करणी सेनेतर्फे येथील जेल रोडवर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा रविवारी (ता. २२) तिसरा दिवस होता. (Karni Sena continues hunger strike for 3rd consecutive day for various demands dhule news)

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला. साक्री तालुक्यात बहुसंख्य गावांमध्ये पवनऊर्जा कंपनीचे टॉवर उभारण्यात आले. त्या वेळी सुझलॉन कंपनीने दत्तक घेतलेल्या गावांना २४ तास वीज, पाणी, रस्ते, दवाखाना, शिक्षणासह विविध सोयी-सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते; परंतु आश्वासन पूर्ण झालेले नाही.

सुझलॉन कंपनीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी यासाठी शुक्रवारपासून राष्ट्रीय करणी सेनेतर्फे जेल रोडवर उपोषणाला सुरवात झाली. करणी सेनेचे राणा मुकेश यांनी सांगितले, की सुझलॉन कंपनीने सुरक्षारक्षकांना पुन्हा नियुक्त करावे. टॉवर असलेल्या जागांचे कर ग्रामपंचायतीस कंपनीने अदा करावे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Khanderao Mandir Yatrotsav: श्री खंडेराव मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त भव्य मिरवणूक

नागरिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत यासह विविध मागण्या आहेत. आंदोलक वामन महिरे, लोटन बोरसे, जिभाऊ साबळे, ब्रिजलाल शेलार, पिंटू महिरे, बाबूलाल धनगर, पंकज बोरसे, निंबा पेंढारे, विलास शेलार, नाना दंडवे, काशीनाथ ठाकरे, रामा जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Dhule News : बांधकामावर खर्च केला 65 लाखांचा; पण जागेवर पूलच नाही?

टॅग्स :DhuleFarmerStrike