कार्तिकस्वामी मंदिरात भाविकांची रीघ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

नाशिक - पंचवटीतील काळाराम मंदिराजवळ असलेल्या कार्तिकस्वामी मंदिरात आज दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रीघ होती. मंदिरात काल (ता. 13) रात्री 11 पासून अभिषेकाला सुरवात झाली. यात पंचामृत, तसेच ऊस, डाळिंबासह विविध फळांचा रस, हळद आणि चंदनाचा अभिषेक करण्यात आला. हा अभिषेक सोहळा पहाटे तीनपर्यंत सुरू होता. भाविकांची गर्दी होणार, याचा अंदाज असल्याने बॅरिकेडिंग करण्यात आले. या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली. मंदिराच्या बाहेर मोरपिसांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. दहा रुपयांना दोन मोरपीस अशा दराने विक्री झाली. मोरपीस कार्तिक स्वामींच्या पायाला लावून घरात ठेवण्याची प्रथा आहे.

नाशिक - पंचवटीतील काळाराम मंदिराजवळ असलेल्या कार्तिकस्वामी मंदिरात आज दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रीघ होती. मंदिरात काल (ता. 13) रात्री 11 पासून अभिषेकाला सुरवात झाली. यात पंचामृत, तसेच ऊस, डाळिंबासह विविध फळांचा रस, हळद आणि चंदनाचा अभिषेक करण्यात आला. हा अभिषेक सोहळा पहाटे तीनपर्यंत सुरू होता. भाविकांची गर्दी होणार, याचा अंदाज असल्याने बॅरिकेडिंग करण्यात आले. या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली. मंदिराच्या बाहेर मोरपिसांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. दहा रुपयांना दोन मोरपीस अशा दराने विक्री झाली. मोरपीस कार्तिक स्वामींच्या पायाला लावून घरात ठेवण्याची प्रथा आहे. पूजा साहित्य, प्रसाद, हार व फुले यांची दुकानेही लावण्यात आली. दर्शनासाठी महिलांची संख्या जास्त होती. 

पन्नास रुपयांना प्रसादाची पिशवी 
येथील मंदिर व्यवस्थापनासह कार्तिकस्वामी मंत्राचा शिक्का मारलेली दहा रुपयांची नोट, दोन लाडू, कार्तिकस्वामींचा फोटो आणि माहितीपत्रिका असे एकत्रित साहित्य असलेली पिशवी पन्नास रुपयांना विक्री झाली.
यासाठी मंदिर व्यवस्थापनाने दहा रुपयांच्या नोटांची व्यवस्था आधीपासूनच करून ठेवली होती. भाविकांची ही पिशवी घेण्यासाठी गर्दी झाली.

Web Title: Kartik Swami Temple nashik

टॅग्स