कोपरगाव खुनातील मुख्य संशयिताचे  वेशांतर करून अमळनेरात वास्तव्य 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 जून 2018

कोपरगाव खुनातील मुख्य संशयिताचे 
वेशांतर करून अमळनेरात वास्तव्य 

कोपरगाव खुनातील मुख्य संशयिताचे 
वेशांतर करून अमळनेरात वास्तव्य 

जळगाव : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे खून करून पसार झालेल्या संशयिताने वेशांतर करून जळगाव, अमळनेरात आसरा घेतला होता. संशयित आरोपीच्या मामाने दारूच्या नशेत भाच्याचे कारनामे मित्रांना सांगितल्याची टीप गुन्हेशाखेला मिळाली आणि संवेदनशील खुनाच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार काही तासातच जेरबंद झाला. अटकेतील संशयिताला कोपरगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 
कोपरगाव (जि.अहमदनगर) येथील गांधीनगर भागात श्‍याम कैलास चव्हाण या तरुणावर दगडाने हल्ला चढवून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (8 जून) मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास घडली. कैलासला ठार मारण्याच्या उद्देशाने हल्लेखोराने मारहाण केल्याने गंभीर जखमी कैलासचा उपचारादरम्यान मृत्यू ओढवला. घटना घडल्यानंतर गुन्ह्यातील संशयित सचिन ऊर्फ जंगल्या गणेश साटोटे (वय-29, .गांधीनगर) याने गाव सोडत जळगाव गाठले होते. शनिवारी जळगावात रहिल्यावर तो सायंकाळी अमळनेर येथे मामाच्या गावी निघून गेला. मामाकडे सचिन वास्तव्याला असताना अहमदनगर पोलिसांनी संशयिताच्या अटकेसाठी जंगजंग पछाडले होते. खून झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी संशयिताच्या अटकेसाठी जोर धरला होता. सचिन ऊर्फ जंगल्या जळगावात व तेथून अमळनेरला आल्याची गुप्त माहिती गुन्हशाखेचे निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील अनिल इंगळे, संतोष मायकल, इंद्रीस पठाण यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीचा पाठलाग करीत संशयितास अमळनेर येथील भोईवाड्यातून पहाटेच ताब्यात घेतले. 

संशयिताचे वेशांतर 
कैलास चव्हाण याच्यावर हल्ला चढविल्यानंतर कोपरगाव येथून फरार झालेल्या संशयिताने जळगाव गाठल्यावर सर्वांत आधी वेशांतर केले. त्यात डोक्‍यावरील केस व दाढी-मिशा पूर्णत: काढून घेत डोळ्यांवरील भुवयाही कुर्तडल्या होत्या. तपास पथकाने अचूक माहितीच्या आधारावर संशयिताला पकडल्यावर आपण चुकीचा माणूस पकडल्याचे समजत पोलिसही चक्रावले. मात्र चौकशीअंती त्याने वेशांतर केल्याचे निष्पन्न झाले. 

दारूच्या गुत्त्यावर मामा बरळला 
अटकेतील संशयिताने अहमदनगर पोलिसांना जेरीस आणले असून, यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा मामा बारमध्ये रविवार साजरा करण्यासाठी मित्रांसाबेत आला होता. चर्चेत डेअरींगबाज शुरविरांच्या कथा सुरू असताना..मामाची जीभ घसरली..अन्‌ ओय..मह्या भाच्यानं खून केलाय...खून, लय डेअरिंग बाज हाय त्यो, आपल्याकडे थांबलाय. नगर पोलिस डॉन को नही ढुंढ सकती, अशा बढाया मारत असताना गुन्हेशाच्या कर्मचाऱ्याच्या कानी पडले. मामा घरी पोचत नाही तोवर त्याच्या भाच्याच्या हातात हातकड्या पडल्या. 
 

Web Title: karun