सामाजिक उपक्रम, उत्सवातून एकात्मतेचे कार्य 

सामाजिक उपक्रम, उत्सवातून एकात्मतेचे कार्य 

सामाजिक उपक्रम, उत्सवातून एकात्मतेचे कार्य 

लीड.. 
राष्ट्रभक्ती, एकात्मता यासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाचा अंकुर फुलविण्याचे काम जळगाव शहरातील युवाशक्ती फाउंडेशन करीत आहे. विविध सण- उत्सवाच्या माध्यमातूनही देशाची संस्कृती जोपासण्याचे कार्य गेल्या नऊ वर्षांपासून फाउंडेशनकडून अविरतपणे सुरू आहे. यंदा "प्लॅस्टिक'चा दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर आरास करून फाउंडेशनच्या समाजप्रबोधनाचा वसा कायम ठेवला 
आहे. 
- भूषण श्रीखंडे 
--- 
वर्षभर विविध उपक्रम व कार्यक्रमांच्या माध्यमातून कायम लोकांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवणाऱ्या युवाशक्ती फाउंडेशनने गणेशोत्सवासोबतच वेगळी ओळख निर्माण केली आहे. यात राष्ट्रीय दिवस, जागतिक दिन साजरे, शहीद दिवस, कारगिल दिन यासारखे राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारे कार्य या फाउंडेशनच्या माध्यमातून केले जात आहे, तसेच देशाची संस्कृती वसा टिकविण्याचे सण दहीहंडी, रंगपंचमी सण साजरे करत आहे. तर गणेशोत्सवात विविध ज्वलंत विषयावर आरास करून सामाजिक संदेश व जनजागृती करण्याचे कार्य संस्था तसेच मंडळातर्फे केले जात आहे. 


विविध उपक्रमांमधून राष्ट्रभक्तीचे दर्शन 
युवाशक्ती फाउंडेशनतर्फे दरवर्षी कारगिल विजय दिनाला राष्ट्रभक्ती कार्यक्रम, कारगिल विजयाचा लघुपट, कारगिल युद्धातील शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार, तसेच काव्यरत्नावली चौकात सैनिकांना श्रद्धांजली. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील नागरिकांना श्रद्धांजली आदी वर्षभर कार्यक्रम घेऊन इतरांमध्ये राष्ट्रप्रेमाचे व एकात्मतेचे बीज रोवण्याचे काम केले जात आहे. 


दुष्काळी गावांना टॅंकरद्वारे पाणी 
युवाशक्ती फाउंडेशनतर्फे वर्षभर कोणत्या कोणत्या उपक्रम राबविण्याचे कार्य सुरू असते. प्रजासत्ताक दिन, 
विज्ञान दिन, महिला दिन, जागतिक पाणी दिन, पर्यावरण दिन, आरोग्य दिवस, रक्तदान दिन, योग दिवस, शेतकरी दिवस या व्यतिरिक्त दुष्काळी गावांना टॅंकरने पाणीवाटप, अनाथालयात जाऊन अन्नदान, युवकांना करिअरबाबत मार्गदर्शन, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करण्यात येते. 


मंडळाच्या कार्यकारिणीत... 
अध्यक्ष पियुष हसवाल, उपाध्यक्ष शिवम महाजन, सचिव प्रशांत वाणी, दीपक धनजे, खजिनदार मितेश गुजर, श्रेयस मुथा, मिरवणूक प्रमुख भवानी अग्रवाल, संदीप तायडे, पूजाविधी प्रमुख पियुष तिवारी, विजय तिवारी, मुरली ओझा, कार्याध्यक्ष विनोद सैनी, नवल गोपाल आदी. 


गणेशोत्सवातून सामाजिक संदेश 
युवाशक्ती फाउंडेशनच्या मंडळातर्फे विविध उपक्रमांबरोबरच सण, उत्सव देखील साजरा केले जातात. यात प्रामुख्याने गणेशोत्सवात वेगवेगळ्या ज्वलंत विषयांच्या माध्यमातून वाहतूक नियम, "स्मार्ट फोनचा फायदा की तोटा' असे ज्वलंत विषय घेऊन आरास करून समाज प्रबोधनाचे कार्य लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत करतात. या वर्षी "प्लॅस्टिकचे दुष्परिणाम' हा पर्यावरणाला जोपासणारा आरास करण्यात येणार आहे. 
---- 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com