कश्‍मिराचा इंग्लंडतर्फे गौरव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

नाशिक - नाशिककन्या कश्‍मिरा निवृत्ती आंधळे यांना नुकतेच इंग्लंड सरकारतर्फे ‘वाइंडरश-७०’ पुरस्काराने गौरविले. वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी व अखंड सेवा कार्याबद्दल इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हस्ते त्यांनी हा सन्मान स्वीकारला.

कश्‍मिरा या नाशिकचे ललित सांगळे यांच्या कन्या. त्यांनी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संस्थेतून फिजिओथेरपी पदवी संपादन केली. विवाह झाल्यावर त्या २००३ मध्ये लंडनमध्ये गेल्या. तिथे गेल्यावर स्वयंसेवी संस्थेत सहभागी झाल्या. दिव्यांगांसाठी कामाला सुरवात केली.

कश्‍मिरा म्हणाल्या, की इंग्लंडमध्ये दिव्यांग व्यक्तींना समाजात सामान्यांप्रमाणे समान स्थान आहे. दिव्यांग फिरतात, शाळेत जातात, कार्यालयीन कामकाजात सहभागी होतात. त्यांना वैद्यकीय सहाय्य केले जाते १८ महिन्यांच्या बालकापासून ज्येष्ठापर्यंत केलेल्या अखंड सेवेचा पुरस्कारासाठी विचार झाला.

भारतीय डॉक्‍टर बुद्धिमान
वैद्यकीय सेवेबद्दल भारतीयांची प्रगत राष्ट्रांशी तुलना होते. त्याबद्दल त्या म्हणाल्या, की भारतीय डॉक्‍टर बुद्धिमान आहेत. त्याची प्रचीती जग घेत आहे. पायाभूत सुविधा आपल्याकडे काहीशा कमी असल्या, तरी सेवेबद्दल आपली तुलना होऊ शकत नाही. इंग्लंडमध्ये फिजिओथेरपीच्या उपकरणाचा आम्ही वापर करत असताना, इंटरनेटवरून शोधत असताना हे उपकरण भारतात वापरले जात असल्याची माहिती मिळते.

फिजिओथेरपिस्ट या क्षेत्रात अभ्यासातून ज्ञान मिळवताना, रुग्ण संवादकौशल्य अवगत करावे. स्वतःच्या मानसिक विकासाचे कौशल्य आत्मसात करत आत्मविश्‍वास वाढविला पाहिजे.
- कश्‍मिरा आंधळे, फिजिओथेरपिस्ट, लंडन

Web Title: kashmira aandhale honor by england