पारंपारिक संस्कृती लोप पावत असल्याने खेडी ओस: कवी राजेंद्र उगले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

सटाणा - शहरात 'नो प्रॉब्लम' परिवाराच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजित 'कसमादे गौरव पुरस्कार' वितरण समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी कवी राजेंद्र उगले बोलत होते. 

सटाणा - शहरात 'नो प्रॉब्लम' परिवाराच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजित 'कसमादे गौरव पुरस्कार' वितरण समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी कवी राजेंद्र उगले बोलत होते. 

यावेळी बोलताना उगले म्हणाले, लग्नातील पारंपारिक गाणी, अंगाई गीत, झोक्याची व जात्यावरील गाणी हे सर्व आता कालबाह्य होत असून, टीव्ही व अल्बमच्या गाण्यांवर या गरजा पूर्ण केल्या जात आहेत. आई-वडिलांना सोडून सर्वांचाच शहरात संसार थाटण्याचा कल सध्या वाढला आहे. खेडी आता खेडी राहिली नसून तो आता एक रिकामा पसारा झाला आहे. बदलत्या काळानुसार ग्रामीण भागातील पारंपारिक संस्कृती लोप पावत चालली असून खेडी ओस पडत आहेत. असे प्रतिपादन कवी राजेंद्र उगले यांनी येथे केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री सप्तशृंगी निवासिनी देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. दिग्विजय शहा, केदा काकुळते, खंडेराव शेवाळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, गिरणा गौरव प्रतिष्ठानच संस्थापक सुरेश पवार, नंदकिशोर शेवाळे, साहित्यायनचे माजी अध्यक्ष प्रा. शं. क. कापडणीस, डॉ. विद्या सोनवणे, भाऊसाहेब अहिरे आदी उपस्थित होते. 

कवी उगले म्हणाले, ग्रामीण संस्कृतीत गावचा 'पार' म्हणजेच सार्वजनिक ओटा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. इतिहासाची साक्ष देणारे पार आजही ग्रामीण भागात दिसतात. मात्र बदललेल्या काळानुसार हे पार आता ओस पडत आहेत. आजच्या नवीन पिढीला पाराची ओळख मराठी चित्रपटातून होते. इंटरनेटच्या जगात फेसबुक, गुगल ही संकेतस्थळे नव्या पिढीचे पार आहेत. मात्र जुन्या पारांचे अस्तित्व, आठवणी तेथील आनंद घेण्यासाठी आजच्या पिढीला पुन्हा पारावर जमावे लागेल. असेही श्री. उगले यांनी स्पष्ट केले. नंदकिशोर शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र निकम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

डॉ. तुषार शेवाळे, सुदर्शन दहातोंडे आदींची भाषणे झाली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना 'कसमादे गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. 
कार्यक्रमाला डॉ. दौलतराव गांगुर्डे, केशव मांडवडे, केदा महिरे, सोपान खैरनार, मुख्याध्यापक एस. बी. कोठावदे, जितेंद्र आहेर, काशिनाथ डोईफोडे, मुरलीधर शेवाळे, वामनराव खैरनार, अरुण भामरे, दिलीप टाटीया, गणेश गावित, शिवाजी भालेराव, पोपट पाटील, दीपक सिसोदे, प्रा. किरण दशमुखे, ए. पी. सूर्यवंशी, अंबादास अहिरे, साहेबराव कदम, वाय. एस. देवरे, सुरेश येवला, आर. एस. सूर्यवंशी, अमोल मोरे, आर. के. खैरनार आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. जितेंद्र भामरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

कसमादे गौरव पुरस्कारार्थी...
सचिन सावंत (जिल्हा बँकेचे संचालक, उद्योग), साहेबराव बच्छाव (गटशिक्षणाधिकारी, शिक्षण), कैलास खैरनार (उपविभागीय कृषी अधिकारी), जिभाऊ कापडणीस (उत्कृष्ट शेतकरी), कलाबाई कोठारी (आदर्श माता), संदीप खैरनार (ग्रामविस्तार), जयश्री आहेर (आदर्श ग्रामदूत) आदी उपस्थित होते. 

Web Title: kasmade award function held in satana