कौस्तुभ दिवेगावकर जि. प.चे नवे सीईओ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

जळगाव - जळगाव जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. जी. कोलते यांची पदभार स्वीकारण्यापूर्वीच बदली झाली असून, त्यांच्या जागी कौस्तुभ दिवेगावकर यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या गडचिरोलीत सहाय्यक जिल्हाधिकारी आहेत. शासनातर्फे आज नवीन दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

शासनातर्फे सहा दिवसांपूर्वी राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यात जळगाव जि. प.चे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांची अकोला जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर आधीच्या यादीत नाशिक महसूल विभागातील उपायुक्त एस. जी. कोलते यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते बुधवारी (ता. 26) आपला पदभार स्वीकारणार होते. मात्र, त्यापूर्वीच नागपूर विभागाच्या मनरेगाच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जि. प.चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारीपदी कार्यरत होते. आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारीपदाचा पदभारही ते सांभाळत होते.

Web Title: Kaustubh Divegaonkar new CEO