कुस्तीच्या आखाड्यात मदानेची बाजी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 November 2019

जळगाव ः मातीतील कुस्तीच्या आखाड्यात मल्लांची चितपट, कधी एखाद्यावर भारी पडलेला मल्ल दुसऱ्या कुस्तीत पट झालेला पाहावयास मिळाला. जळगावमधील कुस्तीच्या आखाड्यात रंगलेल्या अंतिम लढतीत अखेर कोल्हापूरचा भारतकेसरी भरत मदाने याने दिल्लीचा भारतकेसरी तेजवीरला पट देत बाजी मारली. 

जळगाव ः मातीतील कुस्तीच्या आखाड्यात मल्लांची चितपट, कधी एखाद्यावर भारी पडलेला मल्ल दुसऱ्या कुस्तीत पट झालेला पाहावयास मिळाला. जळगावमधील कुस्तीच्या आखाड्यात रंगलेल्या अंतिम लढतीत अखेर कोल्हापूरचा भारतकेसरी भरत मदाने याने दिल्लीचा भारतकेसरी तेजवीरला पट देत बाजी मारली. 

 

 


श्रीराम रथोत्सवानंतर होणाऱ्या कुस्त्यांच्या दंगलीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. केशवस्मृती प्रतिष्ठान, श्रीराम मंदिर संस्थान व रथोत्सव समिती यांच्यावतीने आज शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह मंदिराच्या (स्व.) दादाजी चौघुले क्रीडांगणावर कुस्त्यांची दंगल झाली. स्पर्धेतील पहिल्या कुस्तीची जोड आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेष पाटील, आमदार चंदुलाल पटेल यांच्या हस्ते लावण्यात आली.

Image may contain: one or more people, people sitting and outdoor

याप्रसंगी केशवस्मृती प्रतिष्ठानचे संचालक दीपक जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दुपारी चारपासून सुरू झालेल्या कुस्त्यांची दंगल एकामागून एक रंगत होती. जिंकलेल्या मल्लाला पुन्हा आव्हान देऊन आखाड्यात उतरविण्याचा प्रयत्न दुसऱ्या मल्लाकडून केला गेला. केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रातील नामवंत मल्लांना दोन हात करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने कुस्त्यांसाठी महाराष्ट्रातील विविध भागातूनच नव्हे तर मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाना, झांसी, उत्तरप्रदेश, मेरठ, पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर येथील पहेलवानांचा सहभाग होता. 

Image may contain: 1 person, sitting and outdoor
दोन भारतकेसरींची अंतिम लढत 
खुल्या कुस्ती स्पर्धेत 500 पहेलवानांचा सहभाग होता. कुस्तीतील विजेत्यांना एकूण पाच लाख रुपयांची रोख बक्षिसे वितरित करण्यात आली. या स्पर्धेतील अंतिम मानाच्या जोडीतील कुस्ती केशवस्मृती प्रतिष्ठानच्यावतीने लावण्यात आली. ही लढत दोन भारतकेसरींमध्ये झाली. यात भारतकेसरी तेजवीर पहेलवान (दिल्ली) आणि भारतकेसरी भरत मदाने (कोल्हापूर) यांच्यात झाली. यामध्ये भरत मदाने याने तेजवीरला पट देत जळगावच्या मातीतील कुस्तीवर नाव कोरले. मदाने यांना 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस आमदार सुरेश भोळे, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या हस्ते देण्यात आले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: keshavsmruti dangal kusti bharat madane win