खामखेडा येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

खामखेडा - येथील नारायण पंडित शेवाळे (वय 39) या तरुण शेतकऱ्याने आज कर्जाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली.

खामखेडा - येथील नारायण पंडित शेवाळे (वय 39) या तरुण शेतकऱ्याने आज कर्जाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली.

शेवाळे यांनी विविध कार्यकारी सेवा सोयायटीतून 43 हजार रुपये पीककर्ज, तसेच विहीर खोदण्यासाठी 1 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. शासनाच्या योजनेत त्यांना पीककर्ज माफ झाले; मात्र विहिरीसाठी घेतलेले कर्ज 84 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून थकीत असल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे ते कर्जफेडीसाठी आणखी पैसे मिळतात काय, या विवंचनेत होते; मात्र रक्कम जमवता न आल्याने अखेर त्यांनी बुधवारी रात्री आत्महत्या केली.

Web Title: khamkheda news farmer suicide