Khanderao Mandir Yatrotsav: श्री खंडेराव मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त भव्य मिरवणूक

Dhule: Kalash bearing women along with other devotees participate in procession to mark the restoration of Shree Khanderao Maharaj Temple on Chitod Road in city.
Dhule: Kalash bearing women along with other devotees participate in procession to mark the restoration of Shree Khanderao Maharaj Temple on Chitod Road in city.esakal

धुळे : शहरातील मिल परिसरातील चितोड रोडवरील श्री खंडेराव मंदिर यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. या यात्रोत्सवानिमित्त मंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. रविवारी (ता. २२) सकाळी रंगारी चाळीतील मारुती मंदिरापासून रथावरून महादेवाची पिंडी, कळसपूजन होऊन मिरवणूक निघाली. कलशधारी महिलांचा या मिरवणुकीत सहभाग होता. (Khanderao Mandir Yatrotsav started with restoration of Sri Khanderao Mandir with Procession dhule news)

विविध कार्यक्रम

दरम्यान, यात्रोत्सवानिमित्त २६ जानेवारीला दुपारी बाराला महाप्रसाद, रात्री आठला जागरण गोंधळाचा कार्यक्रम होईल. २७ जानेवारीला सायंकाळी सातला गॅलेक्सी म्युझिक ऑर्केस्ट्राचे कलाकार कार्यक्रम सादर करतील.

यात अहिराणी कलाकार सचिन कुमावत, प्रशांत मोरे, जगदीश संदानशिव, गोविंद गायकवाड आदींची उपस्थिती असेल. २८ जानेवारीला सायंकाळी सातला अहिराणी कीर्तनकार हभप रविकिरण दोंडाईचाकर यांचे कीर्तन होईल. उपस्थितीचे आवाहन यात्रोत्सव समितीने केले आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Dhule: Kalash bearing women along with other devotees participate in procession to mark the restoration of Shree Khanderao Maharaj Temple on Chitod Road in city.
Job Fair : धुळ्यात बुधवारी रोजगार मेळावा; तरुणांना नोंदणीचे आवाहन!

मिरवणुकीत यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष गौतम पगारे, माजी उपमहापौर संतोष महानोर, विकास बाबर, माजी नगरसेवक सुभाष खताळ, किशोर सरगर, नीलेश नेमाने, श्रीरंग जाधव, रामदास महानोर, दत्तू थोरात, जितू इखे, बाळकृष्ण नंदाणे, जगदीश महानोर, राजू महानोर, पंकज गायकवाड, विक्वी शिंदे, विकास महानोर, मारुती सुपनर, सागर शिंदे, ईश्वर जाधव, दादा नंदाणे, गोटू खताळ, राजू दहिहांडे, बापू मराठे, संतोष निस्ताणे, गिरीश गवळी, सुभाष कर्णे, नागेश गिरी, लोकेश गवळी, दीपक सोनवणे, समाधान गवळी, बंडू येरगे, योगेंद्र बारसे, अजय साळवे, गणेश वाघ, नितीन लगड यांच्यासह परिसरातील नागरिकांचा सहभाग होता.

Dhule: Kalash bearing women along with other devotees participate in procession to mark the restoration of Shree Khanderao Maharaj Temple on Chitod Road in city.
Nashik: आपल्या शक्तीने कॅन्सर बरा करा अन् मिळवा 51 लाख रोख; नाशिकच्या महंतांकडून बक्षिस जाहिर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com