पाचशे एकरवर कांद्याच्या रोपवाटिका 

पाचशे एकरवर कांद्याच्या रोपवाटिका 

गणपूर (ता. चोपडा) ः खानदेशात यावर्षी उन्हाळी कांद्याच्या लागवडीचे संकेत मिळू लागले आहेत. लागवडीपूर्वी सुमारे पाचशे एकर क्षेत्रावर कांद्याचे बियाणे टाकून रोपे तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. 
खानदेशात अडावद, किनगाव, नायगाव, चिंचोली, डोणगाव, शिरसोली, गणपूर, गलवाडे, लासुर, चौगाव, वरडी मामलदे, गांधली, विखरण, धमाणे, निजामपूर, जैताने, दुसाने, इंधवे, बलसाने, फोफादे, पिंपळनेर, गोताने, बोरीस, बुरझड, कापडणे, देवभाने आदी परिसरात कांद्याची मोठ्या क्षेत्रावर लागवड होते. खरीप कांद्यात नुकसान संभवत असल्याने उत्पादक आता उन्हाळ कांद्याच्या लागवडीकडे वळले आहेत. सध्या बाजारात कांद्याचे बियाणे 1200 ते 1450 रुपये किलोप्रमाणे विक्री होत असून घरगुती तयार केलेले बियाणे सातशे ते नऊशे रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. अजून येत्या पंधरवड्यापर्यंत बियाणे टाकले जाईल. सद्यःस्थितीत गेल्या महिनाभरापूर्वी टाकलेले बियाण्याचे रोप आता तीन इंचाचे झाले आहे. 
 
लागवड क्षेत्र वाढीची कारणे 
- खानदेशात 120 ते 200 टक्के पाऊस झाल्याने ट्युबवेल, विहिरींना पाणी आल्याने ओलिताची सोय. 
- कांद्याला सध्या असलेला उच्च भाव. 
- पारंपरिक लागवड करणाऱ्या उत्पादकांची संख्या अधिक. 
- पिकापासून चांगल्या उत्पादनाची आशा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com