खानदेशात भाजपचे वर्चस्व; मंत्री जयकुमार रावल यांची बाजी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

गुलाबराव पाटील यांनी धरणगांवच गड राखला

जळगाव: खानदेशातील 16 पालिकांच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपने वर्चस्व राखले. आतापर्यंत जाहिर नगराध्यक्ष पदाच्या निकालात जळगाव जिल्ह्यात एरंडोल, सावदा, पारोळा, फैजपुर, चालीसगांव येथे भाजप उमेदवार विजयी झाले. शिवसेनेने धरणगांव, यावल, पाचोरा येथे तर 2 ठिकाणी शहर विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. एकनाथ खडसेंसाठी प्रतिष्ठेच्या भुसावळ पालिकेत भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.

धुळे जिल्ह्यात मंत्री रावल यानी हेमंत देशमुख यांच्या ताब्यातील दोंडाइचा पालिकेत परिवर्तन घडवून आणले. त्याठिकाणी रावल यांच्या मातोश्री नगराध्यक्ष झाल्या. तर शहाद्यात भाजप उमेदवार विजयी झाले. याठिकाणी एमआयएमचे 4 उमेदवार विजयी झाल्याने जिल्ह्यात एमआयएमचा चंचुप्रवेश महत्वाचा ठरला आहे. एकुणच खानदेशात भाजपला अच्छे दिन आल्याचे चित्र दिसत आहे.

भुसावळ (जळगाव) :
13 प्रभागांतील 26 जागांचे निकाल जाहीर :
- भाजप : 17
- जनक्रांती आघाडी : 7
- शिवसेना : 1
- अपक्ष : 1

Web Title: khandesh nagar palika election