#TuesdayMotivation वयाच्या 56 वर्षी लावणार 21 किमीची दौड! 

khandesh run abhy gujrathi
khandesh run abhy gujrathi

जळगाव ः जळगाव रनर्स ग्रुपच्या माध्यमातून आयोजित खानदेश रन मॅरेथॉन स्पर्धेची एकीकडे सुरू असलेली तयारी आणि दुसरीकडे सहभागी स्पर्धकांचीदेखील तयारी सुरू आहे. स्पर्धेत तरुणच नाही, तर मोठ्या गटातून पन्नाशी उलटलेल्या स्पर्धकांचादेखील सहभाग आहे. यात दोन वेळा हृदयविकाराची शस्त्रक्रिया झालेले 56 वर्षीय डॉ. अभय गुजराथी हे 21 किलोमीटरची दौड लावण्यासाठीची तयारी करत आहेत. 

खानदेश रन मॅरेथॉन स्पर्धा 24 नोव्हेंबरला होत आहे. जळगाव रनर्स ग्रुपकडून तिसरी मॅरेथॉन स्पर्धा घेऊन जळगावात धावण्याचे "कल्चर' निर्माण केले आहे. मॅरेथॉनसाठी तीन महिने अगोदर तयारी सुरू होत असली आणि यात स्पर्धकांकडून धावण्याचा सराव करून घेतला. हे चित्र मॅरेथॉनपूर्वी दिसत असले, तरी रनर्स ग्रुपच्या सदस्यांनी लावलेल्या सवयीमुळे वर्षभर शहरातील चारही बाजूंच्या मोकळ्या रस्त्यांवर धावणारे नरजरेस पडतात. या धावण्याच्या सवयीमुळेच खानदेश रन मॅरेथॉन स्पर्धेत लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा सहभाग वाढत आहे. म्हणूनच जळगावातून पन्नाशी उलटलेल्या नागरिकांचा स्पर्धेत सहभाग झाला आहे. 

दोन वेळा ऍन्जिओप्लास्टी 
धावणे आरोग्यासाठी लाभदायीच असते. याचा अनुभव अनेकांना आहे; परंतु खानदेश मॅरेथॉन स्पर्धेत डॉ. अभय गुजराथी हे तिसऱ्यांदा सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी डॉ. गुजराथी यांनी "खानदेश रन'मध्ये 10 किलोमीटर गटाच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पण, यंदा 21 किलोमीटरमध्ये सहभाग नोंदवून आपली दौड पूर्ण करण्यासाठीची तयारी सुरू आहे. डॉ. गुजराथी यांची दोन वेळा हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली असून, रोज नियमित योगा- प्राणायाम व स्वीमिंग आणि आठवड्यातून दोन दिवस रनिंग व सायकलिंग करत आहेत. यामुळे शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण जाणवत नाही. 

"खानदेश रन'मध्ये तिसऱ्यांदा सहभागी होत असून, यावर्षी 21 किलोमीटर गटात सहभागी होत आहे. यासाठी सुरू असलेल्या सरावातून जळगाव रनर्स ग्रुपकडून मिळणारे मार्गदर्शन आणि सरावाच्या टिप्समुळे सोपे होते. तीन महिन्यांपासून धावण्याचा सराव करत असून, हळूहळू टप्पा वाढवत आहे. रनर्स ग्रुपने सुरू केलेले "कल्चर' हे आरोग्यासाठी उपयुक्‍त आणि आनंद देणारे आहे. 

- डॉ. अभय गुजराथी, नेत्ररोगतज्ज्ञ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com