वय वाढले, पण फिटनेसही वाढला! 

khandesh run jalgaon rajesh jain
khandesh run jalgaon rajesh jain

जळगाव ः धावणे नेहमीच आरोग्यासाठी फायद्याचे ठरत असते. धावण्याचा हाच मंत्र तीन वर्षांपासून सांभाळत सोबत नियमित स्वीमिंग आणि सायकलिंग करत फिटनेस राखण्याचे काम डॉ. राजेश जैन यांनी केले. "खानदेश रन'मध्ये सलग तिसऱ्या वर्षी सहभागी होत आहे. यामुळे वय जरी वाढत असले, तरी थकवा जाणवत नसून, उलट पहिल्यापेक्षा अधिक फिटनेस वाढला असल्याचा अनुभव येत असल्याचे डॉ. जैन यांनी सांगितले. 

जळगाव रनर्स ग्रुपतर्फे जळगावात धावण्याची स्पर्धा "खानदेश रन' या मॅरेथॉनमधून सुरू केली. जळगावात 2017 वर्षापासून "खानदेश रन हाफ मॅरेथॉन'ला सुरवात केली. यंदा तिसरे वर्ष असून, याला प्रतिसाददेखील तितकाच वाढत आहे. या "खानदेश रन'मुळे अनेकांना धावण्याची सवय लावली आहे. म्हणूनच अनेकांनी देशातील आणि देशाबाहेरील मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. इतकेच नव्हे; तर खानदेशातून "आयर्नमॅन' होण्याची कामगिरीदेखील चौघांनी केली आहे. अशाप्रकारे डॉ. राजेश जैन हे गेल्या तिसऱ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असून, धावण्यासोबतच स्वीमिंग व सायकलिंग करण्यास सुरवात केली आहे. 

तिसरी स्पर्धा 21 किलोमीटरची 
जळगावातील न्यूरॉलॉजिस्ट असलेले डॉ. राजेश जैन यांनी पहिल्यांदा मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला, तो 2017 यावर्षी झालेल्या "खानदेश रन' मॅरेथॉन स्पर्धेत. या स्पर्धेत 10 किलोमीटर आणि गतवर्षीच्या स्पर्धेतदेखील 10 किलोमीटर गटात सहभाग नोंदविला होता, तर यंदाची मॅरेथॉन डॉ. जैन यांच्यासाठी "हाफ मॅरेथॉन' म्हणजे 21 किलोमीटरची राहणार आहे. सलग तिसरी स्पर्धा असून, या तिन्ही स्पर्धांमधून जाणवणाऱ्या फिटनेसमध्ये खूप फरक पडला आहे. पहिल्या वर्षी झालेला त्रास दुसऱ्या स्पर्धेत जाणवला नसून, त्याही पेक्षा यावर्षीच्या स्पर्धेसाठीचा फिटनेस अधिक चांगला असल्याचे डॉ. जैन यांनी म्हटले आहे. 

नियमित सराव सुरू 
"खानदेश रन'साठी रनर्स ग्रुपची तयारी सुरू झाली असून, सहभागी स्पर्धकांचे "प्रॅक्‍टिस सेशन'देखील सुरू करण्यात आले आहे. आठवड्यातील मंगळवार, गुरुवार आणि रविवार असे तीन दिवस वेगवेगळे "प्रॅक्‍टिस सेशन' घेतले जात आहेत. या "सेशन'मध्ये सहभागी होऊन टिप्स जाणून घेण्यासोबत सराव केला जात आहे. पण, या सरावाशिवाय डॉ. जैन हे वर्षभर मेहरुण तलाव परिसरात धावण्यासोबत सायकलिंग आणि स्वीमिंग करत आहेत. रनर्स ग्रुपमुळे ही एक सवय झाल्याचे डॉ. जैन यांचे म्हणणे आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com